Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Road : ‘नागरिकांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही!’, आ. स्नेहा दुबेंच्या इशाऱ्यानंतर महापालिकेची धडक कारवाई

Vasai Road : वसंत नगरी ते वसई पूर्व-पश्चिम पुलाच्या रस्त्याच्या जीवघेण्या दुरवस्थेवर आमदार स्नेहा दुबे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर वसई-विरार महापालिका प्रशासनाने दुरुस्तीचा संपूर्ण खर्च 'रिस्क अँड कॉस्ट' तत्त्वावर वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 29, 2026 | 01:33 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नागरिकांच्या जीवाशी खेळ नको
  • आ. स्नेहा दुबेंच्या थेट इशारा
  • त्यानंतर रस्त्याच्या प्रश्नावर महापालिकेची कारवाई
Vasai Road : वसंत नगरी ते वसई पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या पूर्व बाजूकडील मुख्य रस्त्याच्या जीवघेण्या दुरवस्थेप्रकरणी आमदार स्नेहा दुबे यांनी दिलेल्या आक्रमक आंदोलनाच्या इशाऱ्याला अखेर यश आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणारे निकृष्ट रस्ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देत आमदार दुबे यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर महापालिकेने संबंधित कंत्राटदार मे. जैन कन्स्ट्रक्शनकडून रस्ते दुरुस्तीचा संपूर्ण खर्च रिस्क अँड कॉस्ट तत्त्वावर वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीला यापूर्वीच एक वर्षासाठी प्रतिबंधित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ( Vasai Road ) 

Vasai Environment Conservation : वसईच्या पर्यावरण संवर्धनासाठी नारीशक्ती मैदानात! हरित पट्ट्यात वाढीव FSI ला तीव्र विरोध

कंत्राटदाराकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी

या गंभीर प्रश्नावर आमदार स्नेहा दुबे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्तालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत आमदार दुबे यांनी रस्त्याची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती, निकृष्ट कामाची सखोल चौकशी, दोषी अधिकारी व अभियंत्यांवर कारवाई तसेच संबंधित कंत्राटदाराकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी लावून धरली. महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी आमदार दुबे यांना दिलेल्या लेखी पत्रानुसार, रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर तांत्रिक अहवाल सादर करण्याचे निर्देश कनिष्ठ अभियंता व उपअभियंत्यांना देण्यात आले आहेत. पावसाळ्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी मास्टिक पद्धतीने दुरुस्ती, खड्डे भरणे आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य डांबरीकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे.

मुळ ठेकेदाराकडून वसूल करणार खर्च

विशेष म्हणजे, हा रस्ता दोष दायित्व कालावधीत (डीएलपी) असतानाच खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित जैन कन्स्ट्रक्शन कंपनीला वेळोवेळी नोटिसा देऊनही अपेक्षित दुरुस्ती न केल्याने महापालिकेने आता अन्य कंत्राटदारामार्फत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येणारा संपूर्ण खर्च मूळ कंत्राटदाराकडून वसूल केला जाणार आहे.

प्रतिबंधित न करता कठोर कारवाई करावी

आमदार स्नेहा दुबे पंडित यासंबंधित थेट म्हणाल्या, ” कंत्राटदाराला केवळ एका वर्षासाठी प्रतिबंधित न करता अधिक कठोर कारवाई करावी, सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि निकृष्ट कामाबाबत फौजदारी कारवाईचाही विचार करावा, अशी मागणी केली आहे. रस्ता फक्त डांबराचा नसतो, तो हजारो नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग असतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे निकृष्ट काम कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. दोषींवर कारवाई होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील”.

दोषी आढलल्यास अधिकाऱ्यांवर दंडुका

रस्त्याच्या गुणवत्तेची सखोल तांत्रिक तपासणी करण्यासाठी आयआयटी मुंबईशी संपर्क साधण्यात येणार असून, त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. कामात गंभीर दोष आढळल्यास संबंधित अधिकारी आणि अभियंत्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन उपाययोजनेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आरसीसी भित अथवा पिचिग करण्याचा प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

Vasai Virar News : पुनर्विकासाच्या 100 हून अधिक फाईल्स रद्द? Social Media वरील मॅसेजने बिल्डर लॉबीत भीतीचं वातावरण

Web Title: Vasai road mla sneha dubey warns vvcmc action construction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Action Mode
  • Bad Road
  • Palika
  • vasai

संबंधित बातम्या

Masur-Banwadi Phata Road : मसूर-बनवडीफाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; आठ दिवसांत दुरुस्ती करा, शिवसेनेचा इशारा
1

Masur-Banwadi Phata Road : मसूर-बनवडीफाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; आठ दिवसांत दुरुस्ती करा, शिवसेनेचा इशारा

Vasai Road Terminus : पश्चिम रेल्वेचा महत्त्वाकांक्षी विस्तार! वसई रोड टर्मिनसच्या कामाला वेग, कधीपर्यंत पूर्ण होणार काम
2

Vasai Road Terminus : पश्चिम रेल्वेचा महत्त्वाकांक्षी विस्तार! वसई रोड टर्मिनसच्या कामाला वेग, कधीपर्यंत पूर्ण होणार काम

Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या
3

Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.