Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Building Collapse : अचानक भिंतींना तडे गेले अन्… वसईत ऐनपावसाळ्यात 23 कुटुंबे बेघर; महापालिकेकडून बांधकाम जमीनदोस्त

Vasai Building Collapse : वसई पूर्वेतील गोखिवरे येथे नव्या बांधकामासाठी पाया खोदत असताना ही घटना घडली. विकासकाने केलेल्या निष्काळजीपणामुळे शेजारील 'शालोम अपार्टमेंट'ची बी विंग एका बाजूने खचली असल्याचं समोर आलं. सुदैवाने वेळेत रहिवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली असली, यासगळ्या परिस्थितीमुळे ऐनपावसाळ्यात २३ कुटुंबे बेघर झाली

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 23, 2026 | 11:38 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वसईत महिनाभरात चौथी दुर्घटना!
  • विकासकाचा निष्काळजीपणा अन् २३ कुटुंबे बेघर!
  • ऐनपावसाळ्यात कुटुंबांचा आसरा हिरावला!
Vasai Building Collapse : नव्या बांधकामासाठी पाया खोदताना विकासकाकडून झालेल्या निष्काळजीपणाचा फटका शेजारील रहिवासी इमारतीला बसल्याची धक्कादायक घटना वसई पूर्वेतील गोखिवरे येथील लागीपाडा परिसरात घडली. ‘सेतू वन इन्फ्रा’च्या बांधकाम प्रकल्पासाठी पायलिंगचे काम सुरू असताना शालोम अपार्टमेंटच्या बी विंगला अचानक तडे गेले आणि काही वेळातच इमारत एका बाजूने खचली. सुदैवाने वेळीच इमारत रिकामी करण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेमुळे २३ कुटुंबांना घराबाहेर पडावे लागले. ( Vasai Building Collapse )
शालोम अपार्टमेंटच्या शेजारी नव्या इमारतीच्या पायासाठी खोदकाम सुरू होते. याचवेळी शालोमच्या बी विंगला तडे गेल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. परिस्थिती गंभीर होताच प्रभाग समितीचे अधिकारी, अग्निशमन दल आणि वालीव पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

NH 48 Encroachment Action Palghar : अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा, 114 अनधिकृत हॉटेल्स अन् ढाब्यांवर हातोडा; प्रशासन ॲक्शन मोडवर

या कारणामुळे इमारतींना धोका निर्माण

खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करून रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. इमारत अतिधोकादायक अवस्थेत गेल्याने महापालिका प्रशासनाने गुरुवारी ती पाडून टाकली. विशेष म्हणजे, शालोम अपार्टमेंट आधीपासून धोकादायक घोषित केलेली नव्हती.
शेजारी सुरू असलेल्या पायलिंग आणि पाया खोदण्याच्या कामामुळे इमारतीला धोका निर्माण झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे.

नव्या बांधकामांची सुरक्षितता ऐरणीवर

दरम्यान, सतत घडणाऱ्या या घटनांमुळे जुन्या इमारतींसोबतच नव्या बांधकामांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
शेजारील इमारतींना धोका निर्माण होणार नाही, यासाठी पायलिंग, खोदकाम आणि बांधकामाच्या कामांवर महापालिकेने कठोर देखरेख ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

विकासकाला नोटीस

प्रभाग समिती ‘जी’चे प्रभारी सहायक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शालोम इमारत पूर्वी धोकादायक नव्हती.
मात्र, शेजारी सुरू असलेल्या पायलिंगच्या कामामुळे इमारत खचली. कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सेतू वन इन्फ्रा ‘ला नोटीस बजावून पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रभारी सहायक आयुक्त  निलेश म्हात्रे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट केलं की, ” 66 शालोम इमारत धोकादायक नव्हती. शेजारी सुरू असलेल्या पायलिंगच्या कामामुळे इमारत खचली. संबंधित विकासकाला नोटीस देऊन पुढील कार्यवाही सुरू आहे”.

परिसरात महिनाभरात घडली चौथी दुर्घटना

वसई-विरारमध्ये इमारत दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, महिनाभरातील ही चौथी घटना आहे. १७ जुलै रोजी नालासोपारा पूर्वेतील दुर्गेश्वरी अपार्टमेंटच्या ‘सी’ विंगला तडे जाऊन इमारत झुकली होती. १९ जुलै रोजी विरार पूर्वेतील हिराबाई अपार्टमेंटचा स्लॅब कोसळल्याने ६४ कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. तर ८ ऑगस्ट रोजी नालासोपाऱ्यात अवघ्या १५ वर्षे जुन्या रोशनी अपार्टमेंटचा सज्जा कोसळल्याने ५६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले.

Nalasopara News Lizard In Cake : धक्कादायक! केकमध्ये आढळली पाल, नालासोपाऱ्यात खळबळ… 11 जणांची प्रकृती बिघडली

Web Title: Vasai building collapse after piling work 23 families homeless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • building collapse
  • Marathi News
  • palghar
  • Palghar news
  • vasai
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
1

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
2

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
3

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
4

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.