Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Scam : 25 वर्षे सेवा करणारे बाजूला अन् कंत्राटी अधिकारी थेट वरिष्ठ पदावर! पालिकेच्या निर्णयाने कर्मचारी आक्रमक

Vasai Virar Scam : वसई-विरार शहर महानगरपालिकेत प्रदीर्घ सेवा बजावणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांना डावलून बाह्य कंत्राटदार संस्थेमार्फत नियुक्त कनिष्ठ आरोग्य निरीक्षक प्रज्ञा भागवत यांना पशुसंवर्धन, कोंडवाडा व कत्तलखाना या संवेदनशील विभागांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 27, 2026 | 11:24 AM
वसई-विरार पालिकेत स्थायी कर्मचाऱ्यांवर अन्याय! ( सौजन्य - सोशल मीडिया )

वसई-विरार पालिकेत स्थायी कर्मचाऱ्यांवर अन्याय! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • वादग्रस्त कंत्राटी अधिकाऱ्यावर आणखी एका विभागाची मर्जी
  • स्थायी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर आली गदा
  • महासभेतील सूर डावलून काढला २४ तासांत आदेश
Vasai Virar Scam : वसई-विरार महापालिकेत प्रामाणिकपणे प्रदीर्घ सेवा बजावून पदोन्नतीची प्रतीक्षा करणाऱ्या मूळ आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांवर अन्याय करत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर विशेष मेहेरबानी दाखवण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. आधीच वादग्रस्त ठरलेल्या कनिष्ठ आरोग्य निरीक्षक (कंत्राटी) प्रज्ञा भागवत यांच्याकडे आता पशुसंवर्धन, कोंडवाडा व कत्तलखाना या अत्यंत संवेदनशील विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. महासभेत स्थानिक व स्थायी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला प्राधान्य देण्याचा सूर लोकप्रतिनिधींनी आळवल्यानंतर अवघ्या २४ तासांत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने महापालिकेत तीव्र असंतोष पसरला आहे. ( Vasai Virar Scam ) 

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

प्रमाणपत्रे सादर करत पदोन्नतीची मागणी

अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी ८ मे रोजी परिपत्रक जारी करून स्वच्छता निरीक्षक (एसआय) अर्हताधारक स्थायी कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. त्यानुसार अनेक लिपीक व वरिष्ठ लिपिकांनी आवश्यक अर्हता व प्रमाणपत्रे सादर करत पदोन्नतीची मागणी केली होती. मात्र, पात्र आणि स्थानिक स्थायी कर्मचाऱ्यांना डावलून हे परिपत्रक बासनात गुंडाळण्यात आले.

कर्मचाऱ्याला कोणत्या नियमाच्या आधारे वरिष्ठ प्रशासकीय जबाबदाऱ्या ?

‘मे. अर्चना सव्र्हिसेस’ या बाह्य कंत्राटदार संस्थेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्याला वरिष्ठ प्रशासकीय जबाबदाऱ्या कोणत्या नियमांच्या आधारे दिल्या जात आहेत, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, २४ सप्टेंबरच्या या वादग्रस्त आदेशावर संबंधित सक्षम अधिकाऱ्याचे नावच नमूद नसून गोपनीयतेचा बुरखा पांघरण्यात आला आहे.

थेट मुख्य आरोग्य निरीक्षकपदावर वर्णी

एका स्थायी कर्मचाऱ्याला मुख्य आरोग्य निरीक्षक पदापर्यंत पोहोचण्यासाठी किमान २५ ते ३० वर्षांची सेवा करावी लागते. मात्र, अवघ्या सहा वर्षांचा कंत्राटी अनुभव असलेल्या व्यक्तीला थेट प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक बनवण्यात आले. आता त्यात पशुसंवर्धन व कत्तलखान्यासारख्या संवेदनशील विभागांची भर घालत प्रशासनाने जुन्याच गैरकारभारावर शिक्कामोर्तब केल्याचा आरोप होत आहे.

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला

Web Title: Vasai virar corporation controversy over giving charge to contractual officer marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • scam
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…
1

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख
2

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख

Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा
3

Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.