Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Garbage Scam : महापालिकेत 64 कोटींचा कचरा घोटाळा? आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे गंभीर आरोप; तपासावरून प्रश्न

Vasai Virar Garbage Scam : वसई-विरार महापालिकेच्या भोयदापाडा-गोखिवरे येथील कचरा प्रक्रिया आणि बायो-मायनिंग प्रकल्पात तब्बल ६४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 06, 2026 | 12:45 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कचरा प्रकल्पात ६४ कोटींचा घोटाळा
  • आ. स्नेहा दुबे पंडित यांचा आरोप
  • ३७.६६ कोटींच्या FIR पुरता तपास मर्यादित का ?
Vasai Virar Garbage Scam : वसई-विरार महापालिकेच्या भोयदापाडा-गोखिवरे येथील कचरा प्रक्रिया आणि बायो-मायनिंग प्रकल्पात तब्बल ६४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ६४ कोटी रुपयांपर्यंत असताना बोळींज पोलिस ठाण्यात दाखल एफआयआरमध्ये मात्र केवळ ३७.६६ कोटी रुपयांच्या आरडीएफ प्रमाणपत्र गैरव्यवहाराचाच उल्लेख करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मग उर्वरित कथित गैरव्यवहाराचा तपास कोण करणार? असा सवाल करत आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकरणाचा तपास व्यापक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ( Vasai Virar Garbage Scam ) 

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई

भौयदापाडा डंम्पिंग ग्राऊंडवरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या नावाखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांची मुळापासून चौकशी करण्याची मागणी आमदार स्नेहा दुबे यांनी केली आहे. एफआयआरमध्ये बनावट आरडीएफ प्रमाणपत्रांच्या आधारे झालेल्या ३७.६६ कोर्टीच्या फसवणुकीचा उल्लेख असल्याचे आमदार दुबे यांचे म्हणणे आहे. मात्र, निविदा, कार्यादेश, प्रत्यक्ष काम, कचऱ्याचे प्रमाण, बिलांची रक्कम आणि देयकांपासून संपूर्ण आर्थिक साखळी तपासल्यास कथित गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक असल्याचे समोर येऊ शकते, असा आरोप आमदार स्नेहा दुबे यांनी केला आहे. कंत्राटदाराने कचऱ्याची घनता ३४० किलो प्रतिघनमीटरऐवजी ४८० किलो प्रतिघनमीटर दाखवून बिलांमध्ये कथित मोठी वाढ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

स्नेहा दुबे पंडित यांचं म्हणणलं काय?

आमदार स्नेहा दुबे पंडित या स्पष्ट म्हणाल्या की वसई-विरारच्या जनतेच्या पैशाचा प्रत्येक रुपयाचा हिशोब मिळालाच पाहिजे, ६४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप असताना तपास केवळ ३७.६६ कोटीच्या एका प्रकरणापुरता मर्यादित ठेवता कामा नये. दोषी कोणत्याही स्तरावर असला तरी त्याला पाठीशी घालता कामा नये. कठोर फौजदारी आणि प्रशासकीय कारवाई करून महापालिकेचा पैसा वसूल झाला पाहिजे.

बोगस प्रमाणपत्रे ?

आरडीएफ तयार केल्याचे दाखवण्यासाठी बोगस प्रमाणपत्रे वापरण्यात आली का, याचीही चौकशी करण्याची मागणी आहे.
निविदेतील पात्रता, आर्थिक क्षमता, संबंधित संस्थेला काम देताना झालेला नियमबाह्य करार, कार्यादेश आणि बनावट कागदपत्रांचा वापर यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रकल्पादरम्यान नैसर्गिक दगडाचे कथित अवैध उत्खनन व पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तांत्रिक सल्लागार, अधिकाऱ्यांची चौकशी करा

तपास केवळ कंत्राटदारापुरता मर्यादित न ठेवता संबंधित महापालिका अधिकारी, अभियंते, तांत्रिक सल्लागार आणि देयके मंजूर करणाऱ्या मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी. २०२३ पासून कंत्राटदाराला करण्यात आलेल्या सर्व देयकांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करावे. गैरव्यवहारातून आर्थिक लाभ झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांची स्थावर जंगम मालमत्ता आणि बँक खाती कायद्यानुसार गोठवून किंवा जप्त करून महापालिकेचे नुकसान वसूल करावे, अशी मागणी आमदारांनी केली आहे.

Vasai Tehsildar Office : पालिकेच्या नोटिसीला तहसीलचा ठेंगा! मुदत उलटूनही धोकादायक इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल नाही

Web Title: Vasai virar garbage scam bhoyadapada project 64 crore mla sneha dubey allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Garbage Issue
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई
1

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई

Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक
2

Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
3

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

Vasai Virar Roads : दरवर्षी कोट्यवधींचे ‘पॅचवर्क’, मग काँक्रिटचे रस्ते कधी? वसई-विरारकरांचा पालिकेला संतप्त
4

Vasai Virar Roads : दरवर्षी कोट्यवधींचे ‘पॅचवर्क’, मग काँक्रिटचे रस्ते कधी? वसई-विरारकरांचा पालिकेला संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.