Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईमधील सुका कचरा केंद्रांचा होणार कायापालट! रिसोर्स रिकव्हरी केंद्रांसाठी महानगरपालिका मोजणार २३ कोटी ३८ लाख रुपये

Mumbai News: ३० ते ४० टक्के वाटा प्लास्टिक, कागद आणि पुनर्वापरयोग्य घटकांचा म्हणजेच सुक्या कचऱ्याचा असतो. सध्याच्या वर्गीकरण केंद्रांमधील मर्यादा लक्षात घेऊन पालिकेने पाच महत्त्वाच्या ठिकाणच्या कार्यक्षम यंत्रसामग्री आणि स्वच्छ कार्यपद्धती अमलात आणून जास्तीत जास्त साहित्य पुनर्वापरासाठी वेगळे केले जाणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 19, 2026 | 09:25 AM
मुंबईमधील सुका कचरा केंद्रांचा होणार कायापालट! 'रिसोर्स रिकव्हरी' केंद्रांसाठी महानगरपालिका मोजणार २३ कोटी ३८ लाख रुपये

मुंबईमधील सुका कचरा केंद्रांचा होणार कायापालट! 'रिसोर्स रिकव्हरी' केंद्रांसाठी महानगरपालिका मोजणार २३ कोटी ३८ लाख रुपये

Follow Us
Follow Us:

Mumbai News: मुंबई शहरातील पारंपारिक सुका कचरा वर्गीकरण केंद्रांचे अत्याधुनिक ‘संसाधन पुनर्प्राप्ती केंद्रां मध्ये रूपांतर करण्यात येणार असून, यासाठी २३ कोटी ३८ लाख रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणीसाठी ‘राईट्स लिमिटेड’ची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, संस्थेला ९२.५७ लाख रुपये शुल्क देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai News: गोवंडीचा RMC प्लाण्ट होणार बंद! सर्व पक्षांच्या १३ नगरसेवकांचा विरोध; प्रदूषणामुळे टीबी रुग्णांमध्ये वाढ

कामाचे अंदाजपत्रक केले तयार

या प्रकल्पासाठी पालिकेने सूचिबद्ध केलेल्या नामांकित सल्लागार संस्थांमधून ‘राईट्स लिमिटेड’ची निवड केली आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने तांत्रिक क्षमता, शाश्वतता, कार्यक्षमता आणि आर्थिक प्रारूप या निकषांवर मूल्यांकन करून ही शिफारस केली. त्यानुसार राईट्स लिमिटेडने जागेची पाहणी करून तांत्रिक आराखडा, यंत्रसामग्रीचे तपशील आणि अंदाजपत्रक तयार केले आहे.

डम्पिंग ग्राऊंडवर जाणाऱ्या कचऱ्यात होणार घट

३० ते ४० टक्के वाटा प्लास्टिक, कागद आणि पुनर्वापरयोग्य घटकांचा म्हणजेच सुक्या कचऱ्याचा असतो. सध्याच्या वर्गीकरण केंद्रांमधील मर्यादा लक्षात घेऊन पालिकेने पाच महत्त्वाच्या ठिकाणच्या कार्यक्षम यंत्रसामग्री आणि स्वच्छ कार्यपद्धती अमलात आणून जास्तीत जास्त साहित्य पुनर्वापरासाठी वेगळे केले जाणार आहे. यामुळे डम्पिंग ग्राऊंडवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्यास मदत होणार आहे. याशिवाय, पुनर्वापर साखळी अधिक बळकट होऊन असंघटित क्षेत्रातील कचरा वेचकांना सन्माननीय रोजगार मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

CM Devendra Fadnvis यांचा मोठा निर्णय, सरकारी खर्चात 20% कपात, लाडकी बहीण योजनेलाही धक्का?

सल्लागार संस्थेवर या कामांची जबाबदारी

सल्लागार संस्थेवर केवळ आराखडा तयार करण्याचीच नव्हे, तर निविदा प्रक्रियेत सहकार्य, यंत्रसामग्रीची उभारणी, प्रत्यक्ष कामाचा दर्जा, चाचणी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचीही जबाबदारी असणार आहे. प्रत्यक्ष प्रकल्पासाठी सुमारे २३ कोटी ३७लाख ७६ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, सल्लागार संस्थेला ९२ लाख ५७ हजार १८५ रुपये अदा केले जातील. स्थायी समितीची अंतिम मंजुरी मिळताच या कामाची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू केली जाणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news bmc to spend 23 38 crore to upgrade dry waste resource recovery centres sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Garbage Issue
  • Mumbai News
  • Solid Waste Management

संबंधित बातम्या

दुसऱ्या लग्नाचा राग अन् टोकाचा डाव! जावयाच्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून मृतदेह खाडीत फेकला
1

दुसऱ्या लग्नाचा राग अन् टोकाचा डाव! जावयाच्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून मृतदेह खाडीत फेकला

मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोहीम; वांद्रे-खार-सांताक्रझसह अंधेरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा
2

मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोहीम; वांद्रे-खार-सांताक्रझसह अंधेरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Mumbai Powai Lake Restoration: मुंबईची पाण्याची चिंता मिटणार? पवई तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेचा मोठा प्लॅन
3

Mumbai Powai Lake Restoration: मुंबईची पाण्याची चिंता मिटणार? पवई तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेचा मोठा प्लॅन

Mumbai News: गोवंडीचा RMC प्लाण्ट होणार बंद! सर्व पक्षांच्या १३ नगरसेवकांचा विरोध; प्रदूषणामुळे टीबी रुग्णांमध्ये वाढ
4

Mumbai News: गोवंडीचा RMC प्लाण्ट होणार बंद! सर्व पक्षांच्या १३ नगरसेवकांचा विरोध; प्रदूषणामुळे टीबी रुग्णांमध्ये वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.