Pandharpur vitthal mandir ready for ashadi wari 2025
संताच्या सर्व पालखी मार्गांवरील भाविकांना देणारे येणारे सुविधांची कामे देखील अंतिम टप्प्यात आली आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रालयातील टीम ग्राऊंडवर पाहणीसाठी आले आहेत. या टीमने पालखी मार्गावर अंतिम टप्प्यात असलेले कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
रावगाव ता. करमाळा येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी तळावरील रस्त्याचे कामांची पाहणी करून टीमने समाधान व्यक्त केले.
स्मिता पाटील यांच्याकडून तीन पालखी तळाची पाहणी
जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी खडूस येथील उभे रिंगण तसेच पिराची कुरुल येथील पालखीतळ तसेच भंडी शेगाव येथील पालखीतळाची पाहणी करून विविध सुविधांची पाहणी केली. महिलांसाठी असलेला हिरकणी कक्ष तसेच महिलांसाठी स्नानगृहाची व्यवस्था व इतर कामांची पाणी आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी करून त्यांनी पुढील आवश्यक सूचना दिल्या आहेत.
जर्मन हॅंगर निवास व्सवस्थेची ची कामे अंतिम टप्प्यात