Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरज पंचायत समिती निवडीवर ‘अपहरण’चे सावट; सदस्य पांडुरंग इंगळे प्रकरणानंतर बुधगाव बंदची हाक

शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग (तात्या) इंगळे हे निवडीच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर इंगळे यांच्या कथित अपहरणाची माहिती समोर आल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 11, 2026 | 09:40 PM
मिरज पंचायत समिती निवडीवर ‘अपहरण’चे सावट

मिरज पंचायत समिती निवडीवर ‘अपहरण’चे सावट

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मिरज पंचायत समिती निवडीवर ‘अपहरण’चे सावट
  • सदस्य पांडुरंग इंगळे प्रकरणानंतर बुधगाव बंदची हाक
मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत महाविकास आघाडीने एकजूट दाखवत भाजपला धक्का देत सत्ता काबीज केली असतानाच आता या निवडणुकीवरच ‘अपहरण’चे सावट आले आहे. शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग (तात्या) इंगळे हे निवडीच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर इंगळे यांच्या कथित अपहरणाची माहिती समोर आल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

माहितीनुसार, ९ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास बुधगाव पंचायत समिती सदस्य पांडुरंग (तात्या) इंगळे यांना काही अज्ञात व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवत बुधगावमधून उचलून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभापती व उपसभापती निवडणुकीच्या मतदानापासून त्यांना दूर ठेवण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे. रात्री उशिरा अपहरणकर्त्यांनी त्यांची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी तन्वी कमलेकर यांची निवड झाली असून त्या राज्यातील सर्वात कमी वयाच्या सभापती ठरल्या आहेत. तर उपसभापतीपदी ललिता शेजुळ यांची निवड झाली. महाविकास आघाडीने एकजूट दाखवत भाजपच्या संख्याबळाला आव्हान देत ११ विरुद्ध १० मतांनी सत्ता काबीज केली. भाजपकडून सभापतीपदासाठी राणी भोरे रिंगणात होत्या.

Sangli News: माजी खासदारांच्या गावात राजकीय भूंकप! चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांचा अचानक राजीनामा

या निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे सदस्य पांडुरंग इंगळे अनुपस्थित राहिल्याने काही काळ नाट्यमय घडामोडी घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच आता त्यांच्या कथित अपहरणाचा आरोप पुढे आल्याने या निवडणुकीभोवतीचे राजकारण अधिकच चिघळले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ बुधगाव, कावजी खोतमवाडी, बिसूर आणि वाजेगाव परिसरातील कार्यकर्त्यांनी १२ मार्च रोजी कडकडीत ‘बुधगाव बंद’ची हाक दिली आहे. लोकशाही प्रक्रियेला काळीमा फासणाऱ्या या प्रकारातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मिरज पंचायत समिती निवडीचे गणित

सभापती : तन्वी कमलेकर

उपसभापती : ललिता शेजुळ

भाजप उमेदवार : राणी भोरे

महाविकास आघाडीचा विजय : ११ विरुद्ध १० मतांनी

Sangali News: तासगावच्या द्राक्ष संशोधन केंद्राकडे दुर्लक्ष का? सांगलीच्या आमदारांचा लक्षवेधीद्वारे सरकारला सवाल

Web Title: Pandurang ingale kidnapping miraj panchayat samiti politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • sangli news
  • Sangli Politics

संबंधित बातम्या

Sangli: गोपीचंद पडळकर ट्रम्प लेव्हलचे नेते, कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांचा खोचक टोला
1

Sangli: गोपीचंद पडळकर ट्रम्प लेव्हलचे नेते, कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांचा खोचक टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.