Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुळी धरणात शंभर टक्के साठा असूनही गोदावरी कोरडी; धार्मिक विधीसाठी पाणी सोडण्याची भाविकांची मागणी

धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गोदावरी नदीचे पात्र कोरडे ठणठणीत झाले आहे. धरणातून पाणाचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 01, 2026 | 03:35 PM
राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका,

राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका,

Follow Us
Follow Us:

Parbhani News : गंगाखेड : गंगाखेड शहरातून जाणा-या गोदावरी नदीवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाट, वैण्षव घाट, नृसिंह मंदिर घाट, तुळतुंब परिसरातील पुढील घाटातील पात्र कोरठेठाक पडले. या ठिकाणी दशक्रीया विधी, तसेच पवित्र स्नानासाठी राज्य, परराज्यातून येत असतात. या आलेल्या भाविकांना दुषित, दुर्गंधीयुक्त पाण्यात आंघोळ करावी लागते. येथुन जवळच असलेल्या मुळी धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

या धरणातील पाणी शहरातील गोदावरी पात्रात सोडण्याची मागणी भाविक करत आहेत. गंगाखेड शहर प्रति दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदीला धार्मिक परंपरेत मोठे महत्त्व आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ घाटावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र सध्या नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने घाट ओस पडले असून भाविकांना निराश होऊन परतावे लागते. काही भाविकांना धार्मिक विधी करण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आहे, तर काहींनी पर्यायी व्यवस्था शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.

हे देखील वाचा : राहुरीमध्ये पोटनिवडणुकीचे राजकारण! शिवाजी कार्डिलेंच्या जागेवर ‘या’ नेत्याला दिली BJPने उमेदवारी

गोदावरी नदीला पाणी नसल्याने भाविकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नदीत पाणी नसल्यामुळे धार्मिक कार्यक्रमांवरही मर्यादा येतात. अनेक कुटुंबे घाटावर येऊन विधी करण्याची परंपरा जपतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी भाविकांकडून होते. दशक्रीया विधी करण्यासाठी पंचक्रोशीसह राज्य, परराज्यातून लोक येतात. गोदावरी नदीत पाणी सोडल्यास भाविकांची गैरसोय दूर होईल, घाट परिसर पुन्हा गजबजेल आणि धार्मिक वातावरण पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होते.

लघु व्यावसायिकांना आर्थिक फटका

मुळी धरण गोदावरी नदीपासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावरू असताना धरण शंभर टक्के भरलेले असूनही गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये तीक नाराजी व्यक्त होत आहे. किमान धार्मिक स्नानासाठी तरी ठराविक कालावधीत नदीत पाणी सोडावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. “धरणात मुबलक पाणीसाठा असताना नदी कोरडी ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन भाविकांच्या श्रद्धेचा विचार करावा,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका

गोदावरी नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून ती धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विविधा सण, उत्सव आणि धार्मिक विधींसाठी हजारो भाविक येथे येत असतात. मात्र नदीत पाणी नसल्याने या सर्व धार्मिक उपक्रमांवर परिणाम होत आहे. नदीपात्र कोरडे पडल्यामुळे घाट परिसरातील छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. फुलविक्रेते, पूजासाहित्या विक्रेते, चहा-नाश्त्याचे स्टॉलधारक तसेच इतर लघु व्यावसायिक यांचा व्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे.

मागणी न मानल्यास आंदोलनाचा इशारा
दरम्यान, मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा काही नागरिकांनी दिला. प्रशासनाने परिस्थितीची गंभीरता ओळखून तातडीने पाऊल उचलावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मुळी गोदावरी नदी बंधारा अभियंता अभिजीत घोळवे यांनी सांगितले की मुळी बंधा-यात शंभर टक्के पाणी साठवण आहे.

Web Title: Godavari riverbed is completely dry and there is a demand to release water from the muli dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Parbhani

संबंधित बातम्या

‘भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा
1

‘भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.