राहुरी पोटनिवडणुकी 2026 साठी भाजप उमेदवार कडून अक्षय शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Rahuri By-election : अहिल्यानगर : महाराष्ट्रातील दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघ आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचा (Ahilyanagar politics) समावेश आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपचे (BJP Politics) आमदार असलेल्या शिवाजी कार्डिले यांच्या निधनानंतर आता भाजपने नवीन उमेदवार जाहीर केला आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कार्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अहिल्यानगरच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्ती असलेल्या शिवाजी कार्डिले यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यांना अहिल्यानगरच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जात होते. मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. शिवाजी कर्डिले हे भाजपचे नेते असल्यामुळे भाजपने नवीन उमेदवार जाहीर केला. मात्र अहिल्यानगर राजकारणातील कर्डिले यांची जमेची बाजू आणि जनसंपर्क लक्षात घेता त्यांच्याच मुलाला अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : घोर कलियुग! भर रस्त्यात महिलेवर बिहारमध्ये लैंगिक अत्याचार, Video Viral होताच केली कारवाई
शिवाजीराव कार्डिले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे राज्याच्या राजकारणात ठसा उमटवला. ग्रामीण भागातील प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत जनतेचा मनात स्थान निर्माण केले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी विविध पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजना आणि रस्ते विकासावर भर दिला. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला.
सहकार क्षेत्रातही शिवाजीराव कर्डिले यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. सहकारी संस्था, साखर कारखाने आणि बँकांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक सहकारी संस्थांना स्थैर्य मिळाले. राजकीय प्रवासात त्यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप अशा दोन प्रमुख पक्षांसोबत काम केले. त्यांच्या विकासाभिमुख राजकारणामुळे अहिल्यानगरमध्ये कार्डिले यांचे मोठे प्रस्त आहे.
हे देखील वाचा : विरोधकांच्या टीकेनंतर सोडले मौन; अशोक खरात प्रकरणावर अखेर मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया
मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी यांसह देशभरातील आठ जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकांसाठी सहा एप्रिलला अर्ज भरणे, माघारीची मुदत ९ एप्रिल आणि २३ एप्रिलला मतदान होईल. तर चार मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. ही पोट निवडणूक बिनविरोध करण्याचे महायुतीचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीप्रमाणे कोणताही नेता वारल्यानंतर त्याच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणूकीमध्ये विरोधी पक्षाकडून उमेदवार दिला जात नाही.






