
Parents of a five-year-old girl donate eyes in Parbhani Nanded News Update
आपल्या मुलीचा असा अचानक मृत्यू झाला आणि इतका मोठा दुःखाचा डोंगर आपल्यावर असताना देखील लाडाने दाम्पत्यानं एक धाडसी निर्णय घेतला. आपली मुलगी या जगात नसली तरीही तिच्या डोळ्यांमुळे कोणालातरी दृष्टी मिळेल आणि हे जग पाहता येईल या भावनेतून पाच वर्षांच्या मृत चिमुकली स्नेहाचे डोळे तिच्या आई- वडिलांनी दान केले आहेत. या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आला आहे.
मृत चिमुकली स्नेहाच्या आई-वडिलांनी तिचे डोळे दान करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. स्नेहा मनोज लाडाने (वय ५ वर्षे रा. केकरजवळा ता. मानवत) हिचे देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, परभणी येथे गुरुवारी (दि. २७) सकाळी ८.३० वाजता उपचारादरम्यान निधन झाले. या दुःखद प्रसंगात तिच्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तत्काळ जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधल्यानंतर तिचे नेत्र व बुबूळ जालना येथील नेत्र पेढीत पाठविण्यात आले.
हे देखील वाचा : : खेड, जुन्नर झाल आता बिबट्या पुण्यातही! बावधनमध्ये आढळला बिबट्या
डॉक्टरांचे पूर्ण प्रयत्न
जिल्हा सामान्य रूग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र शल्य चिकित्सक डॉ. पुजा चव्हाण व मयुर जोशी यांनी देवगीरी हॉस्पिटलमध्ये नेत्रदानाचे कार्य तत्काळ पार पाडले. व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आला आहे. मृत चिमुकली स्नेहाच्या आई-वडिलांनी तिचे डोळे दान करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. स्नेहा मनोज लाडाने (वय ५ वर्षे रा. केकरजवळा ता. मानवत) हिचे देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, परभणी येथे गुरुवारी (दि. २७) सकाळी ८.३० वाजता उपचारादरम्यान निधन झाले. या दुःखद प्रसंगात तिच्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तत्काळ जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधल्यानंतर तिचे नेत्र व बुबूळ जालना येथील नेत्र पेढीत पाठविण्यात आले. या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना पुन्हा दृष्टी प्राप्त होण्याचा आनंद मिळाला आहे. जिल्ह्यातील हे या वर्षातील पाचवे नेत्रदान ठरले आहे.