Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: ‘शाळा वाचवा’साठी पालकांचा एल्गार! गावराई–सुकळवाड पालकांचे माध्यमिक शिक्षण विभागासमोर आंदोलन

Maharashtra News: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ जिल्हा असून येथे कमी होत चाललेली पटसंख्या आणि शासनाने काढलेल्या धोरणात्मक निर्णयाचा फायदा ही संस्था घेत आहे. त्यामुळे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 20, 2026 | 05:02 PM
Maharashtra News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Maharashtra News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

“शाळा वाचवा” या मागणीसाठी गावराई येथील ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी पालकांसह घेराव आंदोलन करत शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका आम्हाला बसत आहे, आम्हाला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही, शाळा वाचली पाहिजे, गोरगरिबांची मुले आहेत. यावर्षी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही. संस्थेला शाळा बंद करायचे आहे. त्यामुळे गेली चार वर्षापासून हा प्रयत्न सुरू असून त्यामुळे शाळा सुरू राहावी त्याची पूर्तता व्हावी यासाठी गावराई पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी दालनासमोर घेराव आंदोलन छेडले. संबंधित संस्थेला पत्र काढा, प्रत्यक्ष भेट देऊन शाळा सुरू राहिलीच पाहिजे असा पवित्रा घेतला. यावर प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे लेखीपत्र देण्याच्या आश्वासनावर आंदोलन समाप्त झाले.(Maharashtra News)

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर! महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी

“शाळा वाचवा मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण”

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात प्रभारी शिक्षणाधिकारी व्ही. एस. पाटील यांची भेट घेतली. सरस्वती विद्यामंदिर सुकळवाड, गावराई पंचक्रोशीतील ग्रामस्थानी घेराव आंदोलन छेडले. यावेळी प्रकाश पावसकर, सरपंच किशोर पेडणेकर, माजी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, बाबुराव मसुरकर, गुरु परुळेकर, अनिल पालकर, सुनील पालकर, गितांजली हिंदळेकर, गावराई उपसरपंच सतोष सामंत, राजू परुळेकर, भाऊ पाताडे, अजय मयेकर, अजय मयेकर, हरी वायंगणकर, प्रसाद मोरजकर, सागर कुशे यांच्यासह विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. “यावेळी मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण”, “संस्था आणि शाळा कारभारावर लक्ष ठेवा गरीब एनटीएसटी अपंग मुलांसाठी शाळा सुरू ठेवा” “शाळा वाचवा मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण” अशा विविध फलक झळकवण्यात आले होते.
संस्थेच्या चाललेल्या मनमानी कारभाराबाबत शाळाबंद झाल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर संबंधित संस्थेला पत्र

सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात शिकणारेमुली असून सुकळवाड, गावराई-धनगरवाडी सडापासून चार किमी अंतरावर पायपीट करून शाळेत येतात. त्यांना अन्यत्र एसटी प्रवास करून जाणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे ही शाळा शून्य शिक्षकी नसून २३ पटसंख्या आहे. पटसंख्या असूनही शाळा बंद का करतात ? माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर संबंधित संस्थेला पत्र पाठवावे आणि शाळा सुरू करावे संस्थेचे संस्थाचालक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असतील आणि मनमानी करत असतील तर हे बाब योग्य नसून शाळा बंद करण्यासाठी त्यांचे चाललेले प्रयत्न आहेत. शिक्षण विभाग यावर डोळेझाक करणार का ? असाही सवाल ग्रामस्थांनी मांडला. पाच वर्षापासून ही शाळा असून संस्थेला बंद करण्यातच त्यांनी घाट घातला असल्याचे प्रकाश पावस्कर यांनी सांगितले. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून जूनपासून शाळा सुरू होऊ नये, अजूनही आठवीच्या वर्गाला संस्थेकडून रजिस्ट्रेशन मिळत नाही याबाबत शाळा सुरूच राहिला पाहिजे असा प्रश्न ग्रामस्थांनी मांडला.

Mumbai News: मोठी बातमी! मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू; २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम; मोर्चे आणि जमावावर पोलिसांची नजर

शाळा कशी बंद होईल ?

सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ जिल्हा असून येथे कमी होत चाललेली पटसंख्या आणि शासनाने काढलेल्या धोरणात्मक निर्णयाचा फायदा ही संस्था घेत आहे. त्यामुळे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा कशी बंद होईल ? या दृष्टीने संस्थेचा प्रयत्न आहे. या शाळेमध्ये सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा विषयक कोणतेही उपक्रम घेतले जात नाहीत. गेली चार वर्षे संस्था शाळा बंद पाडणे याच पवित्रा असल्याचे माझी सभापती अजिंक्य पाताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
जोपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून संस्थेला लेखीपत्र काढले जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा आमचा पवित्रा असल्याचे प्रकाश पावसकर यांनी स्पष्ट केले.

मुलांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊ : पालकमंत्री नितेश राणे

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वियसहायक मनोज भोगटे यांनी संपर्क साधून गावराई सुकळवाड सरस्वती विद्यामंदिर हायस्कूल आणि संस्थेच्या या शैक्षणिक प्रश्नाबाबत लक्ष वेधले असता मुलांच्या हिताच्या दृष्टीने आपण योग्य तो निर्णय घेऊ, पटसंख्येच्या शासनाने काढलेल्या अध्यादेशाबाबत फेरबदल करण्यात येत आहे. या प्रश्न आपण संबंधित पालकग यांच्याशी येत्या काही दिवसात भेट घेऊन चर्चा करू असे सांगितल्याचे स्विय सहायक मनोज भोगटे यांनी सांगितले. दरम्यान, भोगटे यांनी सदर आंदोलनाची माहिती मिळतात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन याबाबत गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने आणि शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी मुलांना शाळेत हजर करून घेतले जात नाही ही बाब गैर आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घ्या आणि प्रत्यक्ष शाळेत भेट देऊन शाळा यावर्षी मुलाचे शैक्षणिक हिताच्या दृष्टीने सुरु ठेवा ही बाब आपण पालकमंत्र्यांच्या कानी घालत असल्याचेही त्यांना सांगितले.

Web Title: Parents protest to save gavaraisukalwad school lay siege to education department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • maharashtra
  • MLA Nitesh Rane
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.