Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

बाजारपेठेत स्वस्त कृत्रिम व प्लॅस्टिक फुलांचा सुळसुळाट झाल्याने अस्सल फुलांची मागणीच घटली आहे. परिणामी फुलशेतीचा सुगंध बाजारात पोहोचण्याआधीच शेतातच कोमेजू लागला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 17, 2026 | 06:47 PM
गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी दरवर्षी सुगंधी आणि रंगीबेरंगी नैसर्गिक फुलांची मागणी वाढते. यंदाही गणेशोत्सवासाठी शेतकऱ्यांनी चार महिने कष्ट घेऊन झेंडू, शेवंतीसह विविध फुलांची लागवड केली. मात्र, बाजारपेठेत स्वस्त कृत्रिम व प्लॅस्टिक फुलांचा सुळसुळाट झाल्याने अस्सल फुलांची मागणीच घटली आहे. परिणामी फुलशेतीचा सुगंध बाजारात पोहोचण्याआधीच शेतातच कोमेजू लागला असून, उत्पादकांच्या हातात अपेक्षित उत्पन्नाऐवजी निराशा आली आहे.

 

गणेशोत्सवाच्या काळात झेंडूला साधारणपणे ८० ते १०० रुपये, तर शेवंतीला १५० ते १७० रुपये प्रतिकिलो दर मिळण्याची अपेक्षा उत्पादकांना असते. यंदा मात्र कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी घटल्याचे उत्पादक सांगतात. त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला असून, घाऊक बाजारात झेंडूला अवघे ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने उत्पादकांच्या आर्थिक गणिताचा ताळमेळच बिघडला आहे.

एक एकर झेंडू किंवा शेवंतीच्या लागवडीसाठी सरासरी ५० ते ७० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मशागत, रोपे, खते, औषधे, मजुरी, तोडणी आणि वाहतूक असा खर्च वाढत असताना बाजारभाव मात्र घसरल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. गणेशोत्सवाच्या काही दिवसांत फुलांना मोठी मागणी राहील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. मात्र ग्राहक आणि सजावट व्यावसायिक नैसर्गिक फुलांऐवजी टिकाऊ आणि पुन्हा वापरता येणाऱ्या कृत्रिम फुलांकडे वळत असल्याने ताज्या फुलांचा उठाव कमी झाला आहे.

जुन्नर तालुक्यात फुलशेतीचे क्षेत्रही लक्षणीय

झेंडू : ३०९ हेक्टर, अॅस्टर : ५८ हेक्टर, शेवंती : ३ हेक्टर,  निशिगंध : ५.४० हेक्टर, गुलाब : ५.४० हेक्टर या क्षेत्रावर अनेक शेतकरी आणि मजुरांचे उत्पन्न अवलंबून आहे. त्यामुळे कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराचा परिणाम केवळ उत्पादकांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण फुलांच्या बाजारपेठेवर होत असल्याचे चित्र आहे. फुलांची तोडणी केल्यानंतर ती बाजारात नेण्यासाठी वाहतूक खर्च होतो. बाजारात मागणी आणि दर नसतील तर तोडणी, पॅकिंग आणि वाहतुकीचा खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे काही उत्पादकांना फुले बाजारात नेण्यापेक्षा शेतातच सोडून देण्याची वेळ येत असल्याचे सांगितले जाते. गणपतीसाठी चार महिने कष्ट करून झेंडू, शेवंती फुलवली. मात्र बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांचा सुळसुळाट असल्याने आमच्या ताज्या फुलांना मागणी नाही. सरकारने प्लॅस्टिक फुलांच्या विक्रीवर प्रभावीपणे कारवाई केली नाही, तर फुलशेती करणेच कठीण होईल,”अशी भावना फूल उत्पादक गणेश गडगे यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

बाप्पाच्या सजावटीत अस्सल फुलांना जागा कुठे?’

गणेशोत्सवात घरगुती सजावट असो वा सार्वजनिक मंडळांची आरास, फुलांना पारंपरिक महत्त्व आहे. मात्र कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांची मागणी कमी होत असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. एका बाजूला शेतकरी पाणी, श्रम आणि पैसा खर्च करून जिवंत फुले फुलवतो; तर दुसऱ्या बाजूला काही मिनिटांत तयार झालेली कृत्रिम फुले बाजारात दीर्घकाळ टिकतात. या स्पर्धेत नैसर्गिक फुलांचा उत्पादक मात्र दराच्या कोंडीत सापडला आहे. कृत्रिम फुलांच्या विक्रीबाबत असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, बाजारपेठेतील विक्रीवर नियंत्रण ठेवावे आणि नैसर्गिक फूल उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उत्पादकांकडून होत आहे.

Web Title: The demand for artificial flowers is increasing during ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Farmers
  • ganesh utsav
  • maharashtra

संबंधित बातम्या

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
1

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
2

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू
3

Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
4

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.