Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Budget चा धमाका! ९७३६ कोटींचा अर्थसंकल्प सादर; पाहा तुमच्या भागात काय नवीन होणार?

शहराची तहान भागवण्यासाठी पवना धरण ते सेक्टर २३ निगडीपर्यंत मोठी समांतर जलवाहिनी टाकली जाणार आहे. यामुळे रावेत बंधाऱ्यावरील ताण कमी होईल.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 25, 2026 | 09:38 AM
पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सन २०२६-२७ या वर्षासाठी ९३२२.१७ कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प सादर
  • शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी पवना धरण ते निगडीपर्यंत समांतर जलवाहिनी टाकली जाणार
  • वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहर सिग्नलमुक्त करणे, ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलांचे मार्ग
PCMC Budget 2026-27: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या ९३२२.१७ कोटी रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पात स्थायी समितीने ४१४.२२ कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण वाढ सुचविली आहे. जुन्या कामांसाठी १३०० कोटी आणि नवीन कामांसाठी २०० कोटींची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आता महापालिका सभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाचा दावा करत असला, तरी धकीत ६२२ कोटींचा मालमत्ता कर वसूल करणे आणि वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.

 

निगडीपर्यंत समांतर जलवाहिनी टाकणार

शहराची तहान भागवण्यासाठी पवना धरण ते सेक्टर २३ निगडीपर्यंत मोठी समांतर जलवाहिनी टाकली जाणार आहे. यामुळे रावेत बंधाऱ्यावरील ताण कमी होईल. तसेच भामा आसखेड धरणावरून पाणी आणण्यासाठी ‘रायझिंग मेन’ आणि साठवण टाक्यांसाठी सुमारे २१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 

सुचविलेले नव्याने काही महत्तवपूर्ण प्रकल्प

कामगार कट्टा: कष्टकऱ्यांसाठी ४ कोटींची तरतूद.
सिग्नलमुक्त शहर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर व उड्डाणपुलांचे जाते.
वॉटर स्पोट्सः कैजुबाई बंधारा येथे जलक्रीडा पर्यटन केंद्र विकास.
बेघरांसाठी निवारा रेल्वे स्टेशन व बस स्थानक परिसरातील बेघरांसाठी १ कोटीची तरतूद.

 

अपेक्षित खर्च- २०२६-२७ ची तरतूद-विशेष उद्दिष्ट

१) पवना समांतर जलवाहिनी / १०० कोटी / ४० कोटी ५० वर्षांच्या लोकसंख्या वाढीचा विचार करून शुद्ध पाणी.
२) सीबीएसई डिजिटल स्कूल / ४०० कोटी / २ कोटी / आर्थिक दुर्बल घटकांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण.
३) स्व. रतनजी टाटा म्युझियम / १०० कोटी / २ कोटी / टाटांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा मिळवण्यासाठी गॅलरी.
४) महिला स्वसंरक्षण केंद्र / ३० कोटी ५ कोटी/ज्युडो कराटे आणि मानसिक सक्षमीकरण प्रशिक्षण.
५) पवना रिव्हरफट विकास १०० कोटी / १५ कोटी नदी पुनरुज्जीवन, सायकल ट्रॅक आणि सुशोभीकरण.
६) अजितसृष्टी स्मारक / २५ कोटी ५ कोटी अजितदादा पवार यांचा पुतळा व डिजिटल गॅलरी.

१३००कोटी जुन्या कामासाठी
२००कोटी नवीन कामांसाठी

लोकहितकारी योजना आणि समाजकल्याण

आरोग्य सेवा हेल्पलाइनः स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १२ कोटींच्या खर्चातून आरोग्य मदतकक्ष सुरू होईल.
महिला आरोग्यः प्रमुख रुग्णालयांत ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी १ कोटीची ‘मॅमोग्राफी’ मशीन खरेदी केली जाणार आहे.
भटक्या श्वानांचा प्रश्नः सर्वोच्च न्यायालयाच्या श्वानांसाठी कायमस्वरूपी निवारागृहे आदेशानुसार उभारण्यासाठी ६ कोटींची तरतूद केली आहे.
पर्यावरण पूरक शहरः महापालिका इमारतींवर सोलर पॅनेल (५ कोटी) आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग (५ कोटी) राबवले जाईल.

उत्पन्न वाढीसाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार

अर्थसंकल्पातील वाढीव निधीसाठी प्रशासनाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले आहेतः
बांधकाम परवानगी विभागः शासकीय मोजणी आणि ‘ना हरकत’ दाखले पुन्हा सुरू झाल्याने गृहप्रकल्पांना वेग येईल, यातून २५८ कोटींचे अतिरिक्त उत्पन्न अपेक्षित आहे.
मालमत्ता करः मालमत्तांची अ आणि ब अशा नव्या वर्गवारीमुळे ५० कोटींची वाढ होईल.
आकाशचिन्ह विभागः जाहिरात होर्डिंगसाठी शहराचे केवळ दोन झोन (R1, R2) केल्याने ३४ कोटींचे उत्पन्न वाढेल.
पाणीपट्टी व भूमी जिंदगीः थकबाकी वसुली आणि मोकळ्या गाळ्यांच्या नियोजनातून अनुक्रमे २० कोटी व ४ कोटींचा महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.

नगरसेवकांची कसोटी आणि प्रभागांचा विकास

चार वर्षाच्या खंडानंतर होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ३२ प्रभागांतील नगरसेवकांनी सुचवलेल्या ११०० नवीन कामासाठी १९६.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
‘प-अंदाजपत्रका’अंतर्गत अनुसूचित जाती जमाती बहुल क्षेत्रासाठी २३ कोटीचा निधी राखून ठेवला आहे. प्रशासनाने आता छोटचा कामांऐवजी मोठी कामे एकत्रित काढण्याचे धोरण स्वीकारले आहे.

 

Web Title: Pcmc budget 2026 27 9736 crore allocated for city development focus on water and infrastructure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Budget 2026-2027
  • Municipal Corporation
  • PCMC Politics
  • Pimpri Chinchwad
  • Water supply

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
2

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन
3

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश
4

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.