Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: नवी सांगवी आणि पिंपळे गुरवमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात वार्ड क्र. २९, पिंपळे गुरव येथील गणेशनगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर परिसरातील एकूण ५३० चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 22, 2026 | 06:55 PM
Pimpri Chinchwad, Illegal Constructions, Demolition Drive, Navi Sangvi, Pimple Gurav,

Pimpri Chinchwad, Illegal Constructions, Demolition Drive, Navi Sangvi, Pimple Gurav,

Follow Us
Close
Follow Us:

PCMC News:  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने पिंपळे गुरव आणि नवी सांगवी भागातील सुमारे २ हजार चौरस मीटरहून अधिक अनधिकृत आरसीसी बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे गुरव येथील ५३० चौ.मी. आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवी सांगवी परिसरातील १ हजार ५४५ चौ.मी. अनधिकृत आरसीसी बांधकामे पाडण्यात आली.मागील आठवड्यात आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कारवाईचा आढावा घेतला होता. शहरातील अतिक्रमणे आणि नियमबाह्य बांधकामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये आरसीसी बांधकामांसोबतच इतर लहान-मोठी नियमबाह्य बांधकामे देखील हटवण्यात आली आहेत.

Mumbai-Pune Expressway Megablock : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात वार्ड क्र. २९, पिंपळे गुरव येथील गणेशनगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर परिसरातील एकूण ५३० चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपअभियंता शाम गर्जे, बीट निरीक्षक विक्रम चव्हाण, राहुल निकम, उमेश लोंढे, ओंकार देशमुख, पूजा राठोड तसेच १३ एमएसएफ जवान, ७ मजूर, २ पोलीस, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबी सहभागी होते.

ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वार्ड क्र. ३१ मधील नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर, गजानन नगर या भागात क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात एकूण १ हजार ५४५ चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत उपअभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, बीट निरीक्षक शाबोद्दिन बागबान, रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने तसेच १८ एमएसएफ जवान, १० मजूर, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबी यांच्या सहाय्याने ही कारवाई पार पडली.

महापालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत विविध ठिकाणी विनापरवानगी आरसीसी बांधकामे, शेड तसेच इतर स्वरूपाची अनधिकृत वाढ आढळून आली. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करत सुमारे काही हजार चौरस फूट क्षेत्रफळातील बांधकामे हटविण्यात आली.

Railway News : पुणेकरांसाठी मोठी संधी! ‘भारत गौरव’ ट्रेनने ५ तीर्थक्षेत्रांचे मिळणार दर्शन

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कारवाईचा नियमित आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाहणी करावी. रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या तसेच शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

Web Title: Pcmc crackdown on illegal constructions over 2000 sq mtrs demolished in pimple gurav and sangvi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
1

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वित्त अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; नेमकं प्रकरण काय?
2

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वित्त अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; नेमकं प्रकरण काय?

Pimpri Chinchwad : मावळात वनसंपदेची निर्घृण कत्तल; लाकूडतोड्या पुष्पा’वर कठोर कारवाईची मागणी 
3

Pimpri Chinchwad : मावळात वनसंपदेची निर्घृण कत्तल; लाकूडतोड्या पुष्पा’वर कठोर कारवाईची मागणी 

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती, विकासकामांना स्थायीची मंजुरी; बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय
4

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती, विकासकामांना स्थायीची मंजुरी; बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.