Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘… पप्पा मंत्री’; विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची वर्णी? मुलाच्या बॅनरने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत अण्णा बनसोडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2025 | 07:27 PM
'झाले बरका पप्पा मंत्री'; विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बनसोडेंची नियुक्ती? 'या' बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

'झाले बरका पप्पा मंत्री'; विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बनसोडेंची नियुक्ती? 'या' बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:

पुणे/प्रतिक धामोरीकर: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने (NCP) विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या नावापुढे अंतिम मोहर लावली आहे. पक्षाच्या सूत्रांनी या निर्णयाची पुष्टी केली. अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत.

राजकारणात ते अजित पवारांचे खूप जवळचे सहकारी मानले जातात. तथापि, त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षात आधीच चर्चा सुरू होती आणि आता अधिकृतपणे त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. परंतु महायुतीकडून त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा अद्याप प्रतीक्षेत आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीसांनी डिप्टी स्पीकर ह्यांच्या नावाबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येईल असे म्हटले आहे. पण त्याआधीच, रविवारपासून, पिंपरी शहरातील चौकाचौकात आमदार अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छाचे मोठमोठाले बॅनर आणि होर्डिंग्ज झळकताना दिसत आहेत. तसेच, कार्यकर्त्यांकडून उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे.

वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत अण्णा बनसोडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्रात राजकीय वातावरण आधीच तपले आहे आणि आता राज्याच्या राजकारणातही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे, कारण विधानसभेच्या उपसभापती पदाचा विधानसभेतील सत्ता संतुलनावर परिणाम होऊ शकतो. त्याच वेळी, अण्णा बनसोडे यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी कांग्रेसला अनुसूचित जातीच्या मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करण्यास मदत होऊ शकते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर राहुल नार्वेकर यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले होते.  परंतु उपसभापती पद रिक्त होते. राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हा निर्णय अजित पवारांच्या धोरणात्मक हालचालीचा एक भाग असू शकतो, ज्यामुळे त्यांच्या पक्षाला विधानसभेत अधिक प्रभावी भूमिका बजावण्याची संधी मिळेल.

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, हा निर्णय राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कारण पिंपरी चिंचवड़ मनपा प्रमुख मनपा असून येथे भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने सुद्धा लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच अनेक इच्छूक कार्यकर्ता पदाधिकारी निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. झाले बरका पप्पा मंत्री,…. एकीकडे कार्यकर्ता सोबत पदाधिकार्यांकडून शुभेच्छा चे बैनर झळकतांना त्यांत सिद्धार्थ बनसोडे ह्यांचे बैनर राजकीय चर्चांना उधान आनत आहे. त्यांच्या बैनर मध्ये ठळक शब्दात लिहल आहे कि, “झाले बरका पप्पा मंत्री” ह्यांचा राजकीय वर्तुळात सगळेच आपआपल्या परिने तर्क वितर्क लावत आहे.

Web Title: Pcmc mla anna bansode chance maharashtra assembly deputy speaker ajit pawar cm devendra fadnavis politics marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 07:23 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Anna Bansode
  • devendra fadnavis
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
3

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.