Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडक्या डोक्याच्या लोकांनी चुकीची माहिती शाहू महाराजांना दिली; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 29, 2022 | 02:57 PM
किडक्या डोक्याच्या लोकांनी चुकीची माहिती शाहू महाराजांना दिली; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरुन शिवसेनेवर अवमान केल्याचा आरोप केला. यावर शाहू महाराज छत्रपती यांनी स्पष्टीकरण देत शिवसेनेने छत्रपतींचा अवमान केलेला नाही, कोणत्याच पक्षाने कधीच छत्रपतींच्या गादीचा अवमान केला नाही. कायम सन्मान केला आहे, उमेदवारीचा आणि छत्रपतींच्या घराण्याचा संबंध नसल्याचे शाहू महाराज यांनी म्हटले होते.

दरम्यान यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत, त्या गादीचा एक मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले असले तरी त्यासंदर्भात मी बोलणार नाही. मला एवढंच वाटतं की त्या संदर्भात स्वतः छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात संभाजीराजे म्हणाले आहेत की “मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो की मी जे बोललो ते सत्य बोललो” मला असं वाटते की त्यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे.

तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मला एकाच गोष्टीच दुःख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना हे समजत नाही की त्यांच्या अशा वागण्यामुळे एका बाजूला ते छत्रपती संभाजीराजेंना खोटे ठरवत आहेत. तर दुसरीकडे ते शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात काही अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे असं करत आहे त्यांच्या अशा वागण्याबद्दल मला प्रचंड दुःख आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये म्हणून प्रयत्न

युवराज संभाजीराजे यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते. आणि सध्याही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्यांचे कुठलेही नुकसान भाजपला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

[read_also content=”भाजपने एमआयएमसह वंचितला १ हजार कोटी दिले: चंद्रकांत खैरे यांचा गौप्यस्फोट https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-gives-rs-1000-crore-to-deprived-including-mim-chandrakant-khaires-assassination-nrdm-285999.html”]

जेव्हा आभार मानण्याकरिता संभाजीराजे मला भेटले त्याआधीच त्यांनी घोषणा केली होती की, ते कोणत्याही पक्षाचे तिकीट घेणार नाहीत. त्यांनी स्वतंत्र उभे राहणार असे जाहीर करत आमच्याकडे अपक्ष म्हणून सर्व पक्षांनी भाजपसह पाठिंबा दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मी त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला तर हायकमांडकडे सर्व माहिती मांडेल असे आश्वासन दिले होते, असंही फडणवीस म्हणाले.

Web Title: People with crazy heads gave wrong information to shahu maharaj allegation of devendra fadnavis nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2022 | 02:57 PM

Topics:  

  • Chatrapati sambhajiraje
  • devendra fadanvis
  • NAVARASHTRA
  • sanjay raut

संबंधित बातम्या

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…
1

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर
2

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली
3

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई
4

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.