Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यात ८ टक्के मतदारांची वाढ; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट आरोप

गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेतील सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे, व्हिडीओ रेकॉर्डिंग्स  निकालानंतर ४५ दिवसात नष्ट करण्याचा निर्णय़ घेतला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 24, 2025 | 01:45 PM
Rahul Gandhi News: देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यात ८ टक्के मतदारांची वाढ; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट आरोप
Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi  Allegations on Devendra  Fadnavis:  काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी फेरफार झाल्याचा आरोप करत आहेत. या सगळ्यात गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेतील सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे, व्हिडीओ रेकॉर्डिंग्स  निकालानंतर ४५ दिवसात नष्ट करण्याचा निर्णय़ घेतला. आयोगाच्या या निर्णय़ावर राहुल गांधी यांनी पुन्हा संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.

राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाऊटंवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मतदारयादीत पाच महिन्यात ८ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा केला आहे. राहुल गांधी यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसत आहेत.

Crime News Live Updates : पतीने चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून

काय म्हटले आहे राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये ?

“महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात केवळ पाच महिन्यांत मतदार यादीत ८% वाढ झाली आहे.काही मतदान केंद्रांवर ही वाढ २०% ते ५०% दरम्यान आहे. बीएलओंनी (बूथ लेव्हल अधिकारी) काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची माहिती दिली आहे.माध्यमांनी शेकडो अशा मतदारांचा शोध लावला आहे, ज्यांचे पत्ते पडताळणीयोग्य नाहीत.आणि निवडणूक आयोग? शांत – की मग हातमिळवणी? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, ही वेगवे गोंधळ नाहीतर तर हा मतांची चोरी आहे.  झाकपाक करणे म्हणजे हा आरोप  स्वीकारल्या सारखा आहे. म्हणूनच आम्ही मशीन-पठणीय डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत. असा आरोप राहुल गांधींना केला आहे.

In Maharashtra CM’s own constituency, the voter list grew by 8% in just 5 months.

Some booths saw a 20-50% surge.

BLOs reported unknown individuals casting votes.

Media uncovered thousands of voters with no verified address.

And the EC? Silent – or complicit.

These aren’t… pic.twitter.com/32q9dflfB9

— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 24, 2025

 

इंग्रजी वृत्तवाहिनी “न्युजलॉण्ड्री” या वृत्तवाहिनीने यासंदर्भात एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे, या अहवालाच्या आधारेच राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगावर हे आरोप केले आहेत. या अहवालात काही गंभीर दावे करण्यात आले आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षी २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या फक्त ६ महिन्यांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात तब्बल २९,२१९ नव्या मतदारांची नोदं करण्याकत आली. म्हणजेच दररोज जवळपास १६२ नवे मतदार जोडण्यात आले. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील नव्या मतदारांची ही वाढ ८.२५ टक्के इतकी आहे. ही ८.२५ टक्के वाढ आहे, जी निवडणूक आयोगाच्या स्वतःच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य पडताळणी तपासणी सुरू करणाऱ्या ४ टक्के मर्यादेपेक्षा दुप्पट आहे.

Sanjay Kapur च्या Sona Comstar ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनीचा नवा चेअरपर्सन, 30 हजार कोटीचा

तरीही, ज्या भागांमध्ये सर्वाधिक नवीन मतदार नोंदले गेले, तिथे अशी कोणतीही तपासणी झाली नसल्याचे काही स्थानिक मतदान कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. न्यूजलॉन्ड्री या संस्थेने ५० बूथवर केलेल्या तपासणीत निदर्शनास आले की, किमान ४,००० मतदारांचे पत्तेच उपलब्ध नव्हते. खरं तर, बोगस मतदार आहेत का, हे तपासणं निवडणूक आयोगाचं काम आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात २,३०१ मते वगळण्यात आली होती, जी एकूण मतदारांच्या ०.६ टक्के होती. या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा ३९,००० मतांनी पराभव केला. हा फडणवीस यांचा सलग चौथा विजय होता. भाजपचे मत १४,२२५ ने वाढले, तर काँग्रेसचे फक्त ८,००० नेच.

गेल्या काही वर्षांपासून, विविध राज्यांमध्ये – जसं की दिल्ली, उत्तर प्रदेश, आणि आता महाराष्ट्रात – विरोधी पक्षांनी मतदार यादीतील गोंधळावर निवडणूक आयोगावर टीका केली आहे. राहुल गांधींनीही महाराष्ट्रात “हेराफेरी” झाल्याचा आरोप केला होता.

“हे मतदार सापडलेच नाहीत”

निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी अतिरिक्त तपासणीचे नियम बनवले आहेत, जिथे मतदारसंख्येत ४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ किंवा २ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “२ टक्के आणि ४ टक्के या मर्यादा ठरवलेल्या आहेत. मतदार यादीतून नाव वगळणं हे अधिक संवेदनशील असल्याने तिथे २ टक्क्यांची मर्यादा आहे. नाव वाढल्यास ती चांगली गोष्ट असली तरी, ४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली, तर पुन्हा एकदा तपासणी करणे गरजेचे ठरते.”

 

Web Title: Percent increase in voters in devendra fadnavis constituency in five months rahul gandhi directly accuses fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Assembly Elections 2024
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
2

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
3

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
4

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.