सोना कॉमस्टारला मिळाला नवा चेअरमन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती आणि सोना कॉमस्टारचे दिवंगत अध्यक्ष संजय कपूर यांच्या निधनानंतर, कंपनीने त्यांचा उत्तराधिकारी निवडला आहे. सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड (सोना कॉमस्टार) ने जेफ्री मार्क ओव्हरली यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
भारतातील आघाडीची मोबिलिटी टेक्नॉलॉजी कंपनी सोना कॉमस्टारने त्यांचे दिवंगत अध्यक्ष संजय कपूर यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या निधनानंतर त्यांना चेअरमन एमेरिटस (मानद अध्यक्ष) पद दिले आहे, त्यामुळे सध्या तरी संजय कपूर यांच्या निधनानंतर जेफ्री हा कारभार सांभाळणार असल्याचे समोर आले आहे (फोटो सौजन्य – )
हृदयविकाराच्या झटक्याने निधन
१२ जून रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यानंतर, कंपनीची जबाबदारी त्यांच्या बहिणींना दिली जाऊ शकते असे मानले जात होते, परंतु कंपनीने आता अधिकृतपणे जेफ्री यांना नवीन अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार, जेफ्री मार्क ओव्हरली यांची संचालक मंडळाने अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ते १२ फेब्रुवारी २०२१ पासून कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून काम करत आहेत.
आई शपथ! रंग बदलणारी कार, 8 वे आश्चर्य की काय? Porsche Car चा ‘कारनामा’
जेफ्री मार्क ओव्हरली कोण आहेत?
जेफ्री मार्क ओव्हरली यांनी सिनसिनाटी विद्यापीठातून औद्योगिक व्यवस्थापनात पदवी प्राप्त केली आहे. त्यांना या उद्योगात ४३ वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते २०२१ पासून स्वतंत्र संचालक म्हणून मंडळाशी संबंधित आहेत. त्यांना ब्लॅकस्टोन, जनरल मोटर्स, डेल्फी आणि कोहलर सारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव आहे आणि त्यांना ऑपरेशन्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रायव्हेट इक्विटीमध्ये तज्ज्ञ मानले जाते.
सोना कॉमस्टार
१९९५ मध्ये स्थापन झालेली सोना कॉमस्टार ही भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. तिचे मुख्यालय गुडगाव येथे आहे आणि अमेरिका, सर्बिया, मेक्सिको आणि चीनमध्ये तिचे प्लांट आहेत. कंपनीचे एकूण मार्केट कॅप ३०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ती जागतिक ऑटो पार्ट्स पुरवठादार म्हणून स्थापित आहे.
संजय कपूर यांचे योगदान
सोना कॉमस्टारच्या यशात संजय कपूर यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने ब्लॅकस्टोनशी भागीदारी केली आणि कॉमस्टारमध्ये विलीनीकरण केले. या हालचालीमुळे कंपनीला इलेक्ट्रिक वाहने, सेन्सर्स आणि सॉफ्टवेअरसारख्या नवीन तंत्रज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
२०१९ पासून अध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या संजय कपूर यांनी सोना कॉमस्टारला जागतिक ऑटो तंत्रज्ञान कंपनी बनवले आहे. त्यांच्या दूरदृष्टी आणि उत्कृष्ट नेतृत्वाची दखल घेत, कंपनीने त्यांना मरणोत्तर “चेअरमन एमेरिटस” ही पदवी बहाल केली आहे.
फक्त Vehicle Number Plate वरून कशी मिळवाल मालकाची माहिती? ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत