शेतकरी केंद्रबिंदू मानून कामकाज
फलटण-खंडाळा तालुक्याचे माजी आमदार श्रीमंत विजयसिंह मालोजीराव नाईक निंबाळकर तथा श्रीमंत शिवाजीराजे यांची सद्शील दुरदृष्टी व लोकोद्धाराची प्रेरणा घेवून आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी केंद्रबिंदू मानून बाजार समिती काम करीत असल्याचे बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
मेहनत उपयुक्त व प्रेरणादायी
बाजार समिती अधिक लोकाभिमुख व स्पर्धाक्षम करण्यासाठी बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन भगवानराव होळकर व संचालक मंडळ यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी रीतीने राबविण्यात बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व त्यांचे सहकारी अधिकारी/कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत उपयुक्त व प्रेरणादायी ठरली आहे.