Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात सभा; वाहतुकीत मोठे बदल, वाचा सविस्तर

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी भागाती ना.सी. फडके चौक ते नाथ पै चौक हा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 12, 2024 | 09:52 AM
Pm Narendra Modi Pune Visit

Pm Narendra Modi Pune Visit

Follow Us
Follow Us:

 राज्यातील विधानसभा निवडणुकांचा अवघा एक आठवडा शिल्लक राहिला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभांचा जोर वाढू लागला आहे. पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात येणार आहे. पण दुसरीकडे मोदींच्या सभेमुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी भागाती ना.सी. फडके चौक ते नाथ पै चौक हा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून  वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी रस्त्यांचा वापर कऱण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :  राज्यावर दुहेरी संकट! आज किमान तापमान 12 अंशांवर, 3 दिवस पाऊस आणि थंडीचं सावट

याशिवाय टिळक आयुर्वेद महाविद्यालय, बाबुराव घुले पथ, आंबील ओढा परिसरातील रस्त्यावरील वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.  साने गुरुजी रस्ता परिसरातील टिळक  रोड ते निलायम चित्रपटगृह या मार्गावरील पार्किंग व्यवस्थाही आज बंद ठेवली जाणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जड वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत शहरात बंदी घालण्यात आली आहे.  याशिवाय  टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतुकासाठी सुरू राहणार आहे.

हेही वाचा :  महाबळेश्वरमध्ये जाणवतीये थंडीची लाट; सातारा जिल्ह्यात पारा चांगलाच घसरला…

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त  शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांनीही नुकताच पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. पुणे पोलील आमि केंद्रीय सुरक्षा दलाकडे  या दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

केंद्रीय सुरक्षा दलाने लोहगाव विमानतळ ते सभा स्थळापर्यंत मार्गाची पाहणी केली आहे. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वान पथके, बॉम्बशोधक आणि नाशक पथकही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखील चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त इत्यादी पोलीस दलातील कर्मचाराही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

याशिवाय, नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान ड्रोन उड्डाणासही बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात ड्रोन कॅमेरे, पॅराग्लायडर्सच्या उड्डाणालाही बंदी घालण्यात आली आहे. नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त महायुतीच्या वतीने  जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

Web Title: Pm narendra modi meeting in pune today major changes in transport nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 09:17 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • narendra modi
  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
4

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.