File Photo : Winter
सातारा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. थंडीची चाहूलही लागत आहे. त्यातच सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. महाबळेश्वरमध्ये 15.4 अंश सेल्सिअस तर साताऱ्यात 16.1 अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आले आहे. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
हेदेखील वाचा : Sharad Pawar : ‘म्हणून मोदींना ते पाप करता आलं नाही’: जामनेरमधून शरद पवारांची घणाघाती टीका
बाजारपेठमध्ये गर्दी फुलली असून, पर्यटक वेण्णा लेक बोटिंगचा देखील आनंद लूटत आहेत. दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला आहे. साताऱ्याचा पारा १६.१ अंशापर्यंत तर महाबळेश्वरचा पारा १५.४ अंशाखाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. मुंबईतही कमाल तापमाना घट झाली असून, शहरात थंडीची चाहुल लागली आहे. दरम्यान, दिवाळी संपली असली तरी दिवाळीत वाजलेले फटाके आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रदुषण मुंबई शहरात आजही कायम आहे. परिणामी, हवा गुणवत्ता निर्देशांक काहीसा धोकादायक स्थितीकडे वाटचाल करताना दिसत आहे.
मुंबईमध्ये दोनच दिवसांपूर्वी सकाळी दाट धुक्याचा थर पाहायला मिळाला. मुंबईचे हवामान सूर्यप्रकाश आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरातील तापमान सध्या २८.९५ अंश सेल्सिअस असून, कमाल तापमान ३०.४९ अंश सेल्सिअस आणि किमान २६.९९ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, अशी शक्यता आहे.
हवेतील आर्द्रता पातळी ५० टक्के आहे आणि वारे ५० किमी/ताशी वेगाने वाहत आहेत. सूर्योदय ६:४३ वाजता होता आणि सूर्यास्त ६:०१ वाजता नियोजित आहे. प्राप्त माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सोमवारी मुंबईत तापमान २७.०६ अंश सेल्सिअस ते ३०३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले.
मुंबईतील AQI 195
मुंबईतील एक्यूआय 195 असून, जो हवेची गुणवत्ता मध्यम असल्याचे दर्शवितो. मुले आणि वृद्धांसह श्वसनाच्या समस्या असलेल्या रहिवाशांना दीर्घकाळ घराबाहेर राहणे टाळण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
पारा @ 15.4 अंश सेल्सिअस
यंदा थंडीची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी दसऱ्यानंतर थंडी पडू लागते आणि दिवाळीत थंडीचा कडाका जाणवतो. मात्र यावर्षी वातावरणातील बदल, लांबलेला परतीचा पाऊस यामुळे अभ्यंगस्नानाला थंडीची तीव्रता कमीच होती. दिवाळीच्या तोंडावर दोन दिवस हवेत गारठा जाणवला. मात्र, पुन्हा तापमानात वाढ झाली. सध्या पहाटेच्यावेळी थंडीने हुडहुडी भरत आहे.
हेदेखील वाचा : राज्यावर दुहेरी संकट! आज किमान तापमान 12 अंशांवर, 3 दिवस पाऊस आणि थंडीचं सावट