पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले महायुतीचे अभिनंदन (फोटो- ट्विटर)
Maharashtra Vidhansabha Nivadnuk 2024: आज राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीने राज्यात अभूतपूर्व असे यश संपादन केले आहे. महायुती 288 जागांपैकी 224 जागांवर पुढे आहे. तर महाविकास आघाडी केवळ 51 जागांवर पुढे आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश महायुतीने मोडून काढले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला क्लीन स्वीप दिल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महायुतीच्या नेत्यांचे ट्वीट करत अभिनंदन केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 2014, 2019 आणि 2024 या काळात भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिकवून दिल्या आहेत. 2014 मध्ये भाजपचे 123 उमेदवार जिंकले होते. 2019 मध्ये 105 आमदार निवडून आले होते. तर 2024 च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दखवले आहे. आजच्या विज्यामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट काय?
विकासाचा विजय. सुशासनाचा विजय. महायुतीला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल महाराष्ट्रातील बहिणी आणि बांधवांचे, विशेष करून तरुणांचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची महायुती कायमच कार्यरत राहील, याबद्दल मी जनतेला आश्वस्त करतो. जय महाराष्ट्र!
Development wins! Good governance wins! United we will soar even higher! Heartfelt gratitude to my sisters and brothers of Maharashtra, especially the youth and women of the state, for a historic mandate to the NDA. This affection and warmth is unparalleled. I assure the… — Narendra Modi (@narendramodi) November 23, 2024
देवेंद्र फडणवीस यांनी 2014, 2019 आणि 2024 या काळात भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिंकवून दिल्या आहेत. 2014 मध्ये भाजपचे 123 उमेदवार जिंकले होते. 2019 मध्ये 105 आमदार निवडून आले होते. तर 2024 च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दखवले आहे. आजच्या विज्यामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
2014 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. 2014 ल ते मुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये ते विरोधी पक्षनेते झाले. तसेच 2022 मध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यात त्यान यश आले. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना अत्यंत ज्येष्ठ नेता म्हणून ओळखले जाते. तसेच शरद पवार यांना राजकारणातले वस्ताद म्हटले जाते. मात्र शरद पवार यांना तोडीस तोड नेता म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभेतील अपयश धुवून काढत फडणवीस यांनी विधानसभेत भाजपला अभूतपूर्व असे यश मिळवून दिले आहे.






