
PMC Election 2026, Pune Municipal Election, BJP Manifesto,
संकल्पपत्रातील मुख्य घोषणा:
कर सवलतींचा दिलासा: प्रामाणिक पुणेकर नागरिकांना मिळकत करातील ४० टक्के सवलत पुढील पाच वर्षे सुरू ठेवणार. तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन
प्रवास आणि मेट्रो: महिलांना मेट्रो व PMPML बस प्रवासात सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास. खडकवासला ते खराडी मेट्रोचा विस्तार थेट विमानतळापर्यंत करणार
आरोग्य सेवा: ३० वर्षांवरील प्रत्येक पुणेकराची वार्षिक आरोग्य तपासणी मोफत केली जाईल. पुण्यात ‘एम्स’ (AIIMS) रुग्णालय आणण्यासाठी प्रयत्न करणार. (BJP Politics)
नवे प्रकल्प: ‘भारत मंडपम’च्या धर्तीवर पुण्यात अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर डेटा सेंटर विकसित करणार
लेक सिटी आणि स्वच्छता: जांभूळवाडी, कात्रज, पाषाण आणि लोणीकाळभोर तलावांचे सुशोभीकरण करून पुण्याला ‘लेक सिटी’ म्हणून ओळख मिळवून देणार. ३०० लोकसंख्येमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणार.
पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकारांनी मागील जाहीरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण झाली का आणि प्रलंबित कामांचे काय? असा रोखठोक प्रश्न विचारला, तेव्हा उपस्थित नेत्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
भाजपकडे ‘विकासाचे इंजिन’ असल्याचा दावा केला जात असला, तरी या इंजिनाला ‘आश्वासनांची पूर्तता’ करणारे डब्बे जोडले आहेत का? असा प्रश्न आता पुणेकर विचारत आहेत.
शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्सवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच वस्ती भागातील सुविधा आणि समाविष्ट गावांमधील रस्ते, पाणी, मलनिस्सारण कामांना प्राधान्य देण्याचे यात नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.