Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane: नितेश राणेंना कांद्यांचा हार…; पोलिसांनी शेतकऱ्याला घेतलं ताब्यात

भारत हा जगातील सर्वात मोठा कांद्याची निर्यात करणारा देश आहे. 2022-23 मध्ये भारताने 2.5 दशलक्ष टन कांद्याची निर्यात केली होती. ज्यातून 4,525.91 कोटी रुपयांची कमाई झाली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 24, 2024 | 01:26 PM
Nitesh Rane: नितेश राणेंना कांद्यांचा हार…; पोलिसांनी शेतकऱ्याला घेतलं ताब्यात
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : सध्या देशभरात दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत  कांदा उत्पादक शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत.त्यामुळे अनेक शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. अशातच काल (23 डिसेंबर)  मंत्री नितेश राणे यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमात बोलत असताना एक वेगळच प्रकार घडला. नितेश राणे सभेला संबोधित करत असनाच अक शेतकरी मंचावर आला आणि त्याने नितेश राणेंना कांद्यांचा हार घातला. त्यावर नितेश राणेंनी त्या शेतकऱ्याला अडवू नका, त्याची समस्या ऐकून घेऊ, असे म्हटले. त्यानंतर शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला बोलू दिले आणि त्याला ताब्यात घेतले.

Allotment of bungalows: मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटपानंतर आता ‘या’ मुद्द्यावरून शिंदे गटाच्या नेत्यामंध्ये नाराजी

अजित पवारांचे केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना

दरम्यान गेल्या आठवड्यात गुरुवारी (19 डिसेंबर)  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला कांद्यावरील 20  टक्के निर्यात शुल्क हटवण्याची विनंती केली होती. त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून नाशिकच्या कांदा शेतकऱ्यांबाबत बोलले होते. पवार म्हणाले की, नवीन पीक आल्याने बाजारपेठेत कांद्याची आवक झाली आहे. शेतकऱ्यांना सरासरी २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने आपला माल विकावा लागतो.

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी नाराज

देशातील सर्वात मोठ्या घाऊक कांदा मार्केट लासलगाव नाशिक येथील कांद्याचे सरासरी दर महिन्याभरात 50 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या महिन्यापर्यंत भाव 4 हजार रुपये प्रतिक्विंटल असताना रविवारी (22 डिसेंबर) ते 2  हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. नवीन खरीप पीक आल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या प्रमुख कांदा उत्पादक भागात नवीन कांद्याची आवक वाढल्याने दर आणखी घसरतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा; केंद्रीय अहवालातून धक्कादायक वास्तव समाेर

ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, कांद्याच्या किरकोळ किमती 60  रुपये प्रति किलोवरून 40 रुपये किलोवर आल्या आहेत. खरीप पिकातील कांदा जास्त काळ ओलाव्यामुळे साठवता येत नसल्याचे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी ते खोदाईसह बाजारात आणतात. यावर्षी चांगला आणि वेळेवर झालेल्या पावसामुळे कांदा आणि टोमॅटो आणि बटाटा यांसारख्या इतर बागायती पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी खरीप कांद्याचे क्षेत्र 0.36 दशलक्ष हेक्टर आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% अधिक आहे. खरीप कांद्याचा एकूण उत्पादनात 20% वाटा आहे. रब्बी कांदा, जो मार्चमध्ये काढला जातो आणि उत्पादनात सुमारे 60% योगदान देतो.

भारत हा जगातील सर्वात मोठा कांद्याची निर्यात करणारा देश आहे. 2022-23 मध्ये भारताने 2.5 दशलक्ष टन कांद्याची निर्यात केली होती. ज्यातून 4,525.91 कोटी रुपयांची कमाई झाली होती. मात्र, वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अलीकडेच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यासारखे पाऊल उचलले आहे. याशिवाय महागाईला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार कांद्याचा साठा मर्यादा वाढवणे, पुरवठा यांसारखी पावले उचलत आहे. तथापि,   किमतीत स्थिरता आणण्यासाठी उत्पादन आणि पुरवठा साखळी सुधारणे देखील आवश्यक आहे.

Web Title: Police arrest farmer who garlanded nitesh rane with onions nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 01:26 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Nashik News
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Parth Pawar NCP Office Scam: मुंढवा जमीन प्रकरणानंतर नवा वाद; पार्थ पवारांवर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप
1

Parth Pawar NCP Office Scam: मुंढवा जमीन प्रकरणानंतर नवा वाद; पार्थ पवारांवर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा
2

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर
3

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

निवडणुकीतील विजयाने हुरळून जाऊ नका; मावळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अजित पवारांचा कानमंत्र
4

निवडणुकीतील विजयाने हुरळून जाऊ नका; मावळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अजित पवारांचा कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.