Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मदरशाच्या नावाखाली 59 मुलांची तस्करी, दानापूर- पुणे एक्स्प्रेसमधून 4 तस्करांना अटक

दानापूर-पुणे एक्सप्रेसमधून 8 ते 15 वर्षे वयोगटातील 59 मुलांची तस्करी केली जात आहे. बिहार राज्यातून पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीतल्या मदरशात या मुलांना आणलं जात जात असल्याची गोपनीय माहिती आरपीएफ पोलीसांना मिळाली.

  • By साधना
Updated On: May 31, 2023 | 01:42 PM
मदरशाच्या नावाखाली 59 मुलांची तस्करी, दानापूर- पुणे एक्स्प्रेसमधून 4 तस्करांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव: मदरशाच्या नावाखाली बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यातून महाराष्ट्रातील सांगलीत जाणाऱ्या 59 संशयित मुलांची सुटका करण्याची कारवाई (Child Trafficking) करण्यात आली आहे. यात 4 संशयितांना अटक (Arrest) करण्यात भुसावळ आरपीएफ पोलीसांना यश आले असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव यांनी दिली. (Jalgaon Crime News)

[read_also content=”चिमुकल्या नातीसमोरच सासऱ्याने सूनेची गळा आवळून केली हत्या, पुण्यातल्या खून प्रकरणाचं नक्की काय आहे कारण? https://www.navarashtra.com/maharashtra/father-in-law-murdered-daughter-in-law-in-front-of-granddaughter-nrsr-407203.html”]

दानापूर पुणे एक्सप्रेसमध्ये धडक कारवाई
दानापूर पुणे एक्सप्रेसमधून 8 ते 15 वर्षे वयोगटातील 59 मुलांची तस्करी केली जात आहे. बिहार राज्यातून पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीतल्या मदरशात या मुलांना आणलं जात जात असल्याची गोपनीय माहिती आरपीएफ पोलीसांना मिळाली. त्यानुसार भुसावळ रेल्वे स्थानकावर दानापुर पुणे एक्सप्रेस आली असता एक्सप्रेसच्या बोग्यांची कसून तपासणी करीत वेगवेगळया बोग्यामधून 29 मुलांना उतरविण्यात आलं. तसेच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. भुसावळ येथील सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आरपीएफ व जीआरपी पथकाने ही धडक कारवाई केली.

मनमाड स्थानकावर 30 तर भुसावळला 29 मुलांची सुटका
तसेच मनमाड स्थानकादरम्यान पोलीस पथकांची तपासणी कारवाई सुरू असतांना अजून 30 मुले आणि चार संशयित व्यक्ती आढळून आले. त्यांना मनमान स्थानकात उतरविण्यात आले. भुसावळ येथे उतरविण्यात आलेल्या 29 मुलांना जळगाव बाल निरीक्षणगृहात तर मनमाड स्थानकावर उतरविलेल्या 30 मुलांना नाशिक बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. आरपीएफ व जीआरपी पथकातील पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये सदर बालकांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

[blockquote content=”सांगलीकडे नेण्यात येत असलेल्या सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पाचही संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात बाल निरीक्षणगृहात रवाना करण्यात आलेल्या मुलांच्या पालकांची माहिती घेण्यात येत आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया व ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.” pic=”” name=”- श्रीनिवास राव, विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे भुसावळ”]

Web Title: Police arrested 4 accused and rescued 59 students from jalgaon railway police nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2023 | 01:39 PM

Topics:  

  • child trafficking
  • Jalgaon News

संबंधित बातम्या

जळगाव हादरलं! दारूच्या नशेत आधी कुऱ्हाडीने पत्नीवर प्राणघातक हल्ला; नंतर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली
1

जळगाव हादरलं! दारूच्या नशेत आधी कुऱ्हाडीने पत्नीवर प्राणघातक हल्ला; नंतर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली

Jalgaon Crime: जळगावमध्ये २१ वर्षीय तरुणाची टोळक्याकडून निर्घृण हत्या;आई-वडिलांनाही बेदम मारहाण
2

Jalgaon Crime: जळगावमध्ये २१ वर्षीय तरुणाची टोळक्याकडून निर्घृण हत्या;आई-वडिलांनाही बेदम मारहाण

Jalgaon News : मला विसरून जा, असं कसं सांगू शकते तू? गर्लफ्रेंडने लग्नाला नकार देताच तरुणाने संपवले जीव; शेवटचा व्हिडीओ वायरल
3

Jalgaon News : मला विसरून जा, असं कसं सांगू शकते तू? गर्लफ्रेंडने लग्नाला नकार देताच तरुणाने संपवले जीव; शेवटचा व्हिडीओ वायरल

Jalgaon Crime :जळगाव पोलिसांची मोठी कारवाई! ४० किलो गांजा जप्त; पोलिसांचा फिल्मीस्टाईल पाठलाग सिसिटीव्हीत कैद
4

Jalgaon Crime :जळगाव पोलिसांची मोठी कारवाई! ४० किलो गांजा जप्त; पोलिसांचा फिल्मीस्टाईल पाठलाग सिसिटीव्हीत कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.