
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
या मेळाव्यात तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांच्या बैंकिंग व्यवहारांची व कर्जवितरणाची प्रक्रिया पार पडल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असून महिला बचत गटांच्या उद्योग-व्यवसायांना नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हा ग्रमीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जळगाव पंचायत सिमतीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन चंद्रकांत सोनवणे, यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने सेवा संकल्प अभियानांतर्गत हेमांगी किशोर टोकेकर प्रभाग समन्वयक जिल्हा परिषद गण नशिराबाद भादली बुद्रुक प्रभाग यांनी महिला स्वयंसहायता समूहांना मार्गदर्शन केले. यावेळी १८ स्वयंसहाय्यता समूहांना तब्बल १ कोटी ८ लाखाचे कर्ज वितरण करण्यात आले.
उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणारे सेवा संकल्प अभियान हे ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, महिलांना केवळ शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, आर्थिक निर्णयक्षमता वाढविणे, उद्योगशीलता निर्माण करणे आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात त्यांचा सहभाग वाढविणे यालाही प्राधान्य दिले जाते.
Jalgaon Tribal Protest: आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर सरकारची चर्चा; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
बैंक मेळाव्यांच्या माध्यमातून महिला समूह आणि बैंक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होतो, समूहांच्या आर्थिक गरजा समजून घेणे, कर्जप्रक्रियेबाबत माहिती उपलब्ध करून देणे, आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे आणि बँकिंग व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे या बाबींना विशेष महत्त्व आहे.
महिला स्वयंसहाय्यता समूह हे ग्रामीण विकासाचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. बचतीच्या माध्यमातून सुरू झालेली महिलांची वाटचाल आज उद्योग, व्यवसाय, उत्पादन, विक्री आणि आर्थिक स्वावलंबनापर्यंत पोहोचत आहे. उमेद अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण होत असून, बँकांशी समन्वय साधून व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळविण्याचा मार्ग अधिक सुलभहोत आहे.
Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा
बैंक मेळाव्यास रविद्र सूर्यवंशी तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती जळगाव है प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून उपजीविका या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. तसेच स्वप्नील सोनार तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन यांनी महिलांना आर्थिक साक्षरतेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच स्वर्णेश गजभिये बी. एम. युनियन बैंक ऑफ इंडिया, नशिराबाद आणि प्रमोद धमाले डी. बी. एम. युनियन बैंक ऑफ इंडिया, नशिराबाद यांनी सुद्धा स्वयंसहायता समूहातील महिलांना उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
Ans: नशिराबाद येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत
Ans: १८ समूहांना.
Ans: १ कोटी ८ लाख रुपये.