Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळ्यात चटणी टाकून दागिने चाेरणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या; पंढरपूर पोलिसांची कारवाई

डोळ्यात चटणी टाकून एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन चोरांना पकडून त्यांच्याकडून १२ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विनोद गोविंद पिंगळे व महादेव शंकर पवार (रा. उजनी कॉलनी श्रीपूर ता. माळशिरस) या आरोपींना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 29, 2024 | 10:54 AM
डोळ्यात चटणी टाकून दागिने चाेरणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या; पंढरपूर पोलिसांची कारवाई
Follow Us
Follow Us:

पंढरपूर : डोळ्यात चटणी टाकून एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन चोरांना पकडून त्यांच्याकडून १२ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विनोद गोविंद पिंगळे व महादेव शंकर पवार (रा. उजनी कॉलनी श्रीपूर ता. माळशिरस) या आरोपींना अटक केली आहे. या दरम्यान आणखी चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पंढरपूर शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, २७ आगस्ट रोजी इसबावी येथील फिर्यादी मैत्रेयी मंदार केसकर यांच्या अंगावर मिरची पुड टाकून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेले होते. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके तैनात करून नाका बंदी केली होती.

यादरम्यान मोटार सायकलवरून संशयित दोघे जात असताना पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटारसायकल थांबवली नाही. पोलिसांनी पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता आरोपींना चोरी केल्याचे उघड झाले आहे. चोरांकडून सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल असा १२ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Police arrested two people who stole jewelery by putting chutney in their eyes nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 10:54 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या
1

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
2

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या
3

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
4

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.