Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Violence News : दगडांचा खच, जाळपोळ, अन्…; नागपूर दंगलीचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती

नागपूरमध्ये जनजीवन सुरळीत असून सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू आहे. नागरिक नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, शहरातील वातावरण अद्याप तणावपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 18, 2025 | 01:29 PM
Nagpur Violence News : दगडांचा खच, जाळपोळ, अन्…; नागपूर दंगलीचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती
Follow Us
Close
Follow Us:

Nagpur News-  नागपूर:  औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात आली आहे. महाल परिसरात काल रात्री मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. हिंसक जमावाने क्रेनसह अनेक वाहने पेटवून दिली, ज्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच पडला होता. मंगळवारी सकाळी नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे दगड हटवून रस्ते साफ केले, तसेच जाळपोळीच्या खुणाही मिटवण्यात आल्या. नागपूरमधील जनजीवन लवकरात लवकर पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागांतील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागांमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे तसेच पाच किंवा त्याहून अधिक जणांनी एकत्र न जमण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सुरळीत असून सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू आहे. नागरिक नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, शहरातील वातावरण अद्याप तणावपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजारांवर, 1 किलो चांदीसाठी मोजावी लागणार तब्बल इतकी रक्कम

नागपूरमधील कालच्या हिंसाचारानंतर पोलिसांनी संपूर्ण रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून दंगल भडकवणाऱ्या अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत 65 संशयितांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी सुरू आहे.

प्राथमिक तपासानुसार, महाल परिसरातील हिंसाचारात सहभागी असलेल्यांपैकी अनेक जण उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी भागातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांची विविध पथके संशयितांचा शोध घेत असून घटनास्थळी काही वाहने तसेच ओळखपत्रे आणि आधारकार्ड आढळली आहेत. अचानक कारवाई झाल्याने अनेक दंगलखोर आपली दुचाकी जागीच सोडून पळून गेले. तसेच काहींची ओळखपत्रे पडल्याने ती पोलिसांच्या हाती लागली आहेत.

भालदारपुरा परिसर हा सर्वाधिक प्रभावित झाला असला, तरी चिटणीस पार्क आणि हंसापुरी भागातही जमावाने दगडफेक व वाहनांची जाळपोळ केली. या घटनेत सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दंगलखोरांनी वाहनांमध्ये कापडाचे बोळे आणि पेट्रोल बॉम्ब फेकून आगी लावल्या. मोठा जमाव असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

PM Modi On RSS: “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घेणे…”; पॉडकास्टमध्ये नेमके काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पोलीस यंत्रणा अपयशी

संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर जमाव कुठून आला, याची कोणालाही माहिती नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, मोमिनपुरातून अग्रसेन चौक मार्गे शेकडो लोक महाल परिसरात दाखल झाले. यामुळे पोलिसांची गुप्तचर यंत्रणा संपूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्याने परिसरातील तणाव वाढला. परिस्थिती हाताळण्यासाठी उशिरापर्यंत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त फोर्स घटनास्थळी पाचारण करण्यात आला.

Web Title: Police have major evidence of nagpur violence nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • maharashtra
  • Marathi News
  • Nagpur
  • Nagpur Violence

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.