पंतप्रधान मोदी यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भाष्य (फोटो- ट्विटर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा असे संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, राजकीय प्रवास आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याबद्दल भाष्य केले आहे. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पॉडकास्टमध्ये नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” जेव्हा जेव्हा आपण शांततेबद्दल बोलतो तेव्हा जग आपले ऐकते, कारण भारत भूमी ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी आहे.” पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधताना भारताची संस्कृती, शांतता आणि जागतिक राजनैतिकता यावर जोर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी, भारत-पाकिस्तान संबंध, युक्रेनमधील शांतता प्रयत्न, चीन आणि शी जिनपिंग यांच्याशी संबंध, २००२ मधील गुजरात दंगल, लोकशाही,एआय शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही त्यांनी आपले विचार व्यक्त केले. .
#WATCH | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लेक्स फ्रीडमैन के साथ पॉडकास्ट में RSS से अपने जुड़ाव के बारे में बात करते हुए कहा, "मैं खुद को सौभाग्यशाली मानता हूं कि मैंने RSS जैसे प्रतिष्ठित संगठन से जीवन का सार और मूल्य सीखा। मुझे उद्देश्यपूर्ण जीवन मिला…"
उन्होंने आगे कहा, "…… pic.twitter.com/5zp2Po0Q7K
— ANI_HindiNews (@AHindinews) March 16, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले, “जेव्हा मी जागतिक नेत्यांशी हस्तांदोलन करतो तेव्हा नरेंद्र मोदी नव्हे तर 140 कोटी भारतीय हस्तांदोलन करत असतात. माझी ताकद माझ्या नावात नाही तर भारताच्या कालातीत संस्कृतीत आहे. या पॉडकास्टमध्ये, पंतप्रधान मोदींनी त्यांचे बालपण, हिमालयातील त्यांची भेट, संन्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि हिंदू राष्ट्रवाद याबद्दलचे त्यांचे विचार मांडले. तसेच 140 कोटी भारतीय माझी ताकद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितले.
RSS बद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, लहानपणापासूनच संघाच्या शाखेत आणि सभांना जाणे आवडत असे. देशाची सेवा करणे हे एकच माझे ध्येय होते. जे मला राष्ट्रीय स्वयंसेसवक संघाने शिकवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. जगात आरएसएसपेक्षा मोठी ‘स्वयंसेवी संघटना’ दुसरी कोणतीही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घेणे इतके सोपे नाहीये. त्यासाठी संघाच्या कार्याला समजणे आवश्यक आहे. ते त्याच्या सदस्यांना जीवनात उद्देश देते. राष्ट्र सर्वप्रथम ही शिकवण संघ शिकवते. समाजसेवा हीच देवाची सेवा आहे. आपल्या वैदिक संतांनी आणि स्वामी विवेकानंदांनी जे शिकवले आहे, तेच संघ देखील शिकवतो.