Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : राष्ट्रवादीने दिला शिवसेनेला चेकमेट; नांदेडमध्ये राजकारण तापण्याची चिन्हे लागली दिसू

नांदेडमध्ये संजय गांधी निराधार समितीच्या नियुक्त्यांवरून राजकारण चांगलेच चर्चेत आले. समिती असल्याने आमदार राजेश विटेकर यांनी प्रतिडाव टाकत या समितीच्या निवडीला स्थगिती मिळवली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 24, 2026 | 02:46 PM
Politics on Chairperson and members of the Sanjay Gandhi Destitute Committee in Manvat Taluka

Politics on Chairperson and members of the Sanjay Gandhi Destitute Committee in Manvat Taluka

Follow Us
Follow Us:

Nanded News : मानवत : पाथरी मतदारसंघात संजय गांधी निराधार समितीच्या नियुक्त्यांवरून राजकारण चांगलेच चर्चेत आले. मानवत तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्ष आणि सदस्याच्या निवडी पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार २० मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करत शिवसेना शिंदे गटाने डाव टाकला. (Political News) मात्र आपल्या कार्यक्षेत्रातल्या समिती असल्याने आमदार राजेश विटेकर यांनी प्रतिडाव टाकत या समितीच्या निवडीला स्थगिती मिळवली आहे. (Nanded News)

शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी भाजपच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शिफारशीच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मानवत तालुक्याची संजय गांधी निराधार समितीवर शिवसेना शिंदे गटाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. मात्र, पाथरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर हे करत असताना या नियुक्त्या त्यांच्या राजकीय क्षेत्रात झाल्याने चर्चा सुरू झाली.

हे देखील वाचा: महिला आयोग अध्यक्षानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद देखील जाणार? रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार

राजकारण तापण्याची चिन्हे लागली दिसू

या पार्श्वभूमीवर समितीवरील निवडीवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असतानाच आमदार विटेकर यांनी पडद्यामागे हालचाली करत अवघ्या ४ तासात त्याच दिवशी २० तारखेला या नियुक्तीना स्थगिती मिळवण्यात यश मिळवले आहे. या घडामोडीमुळे महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी – काँग्रेस या तिन्ही पक्षांतील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक पातळीवरील सत्ता संतुलन आणि प्रभाव टिकवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्र राजकीय हालचाली सुरू असल्याचे यावरून दिसून येते. संजय गांधी निराधार समितीसारख्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या समित्यावरील नियुक्त्यांनाही आता – राजकीय रंग चढू लागल्याची चर्चा मतदारसंघात रंगली असून, पुढील काळात या प्रश्नावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद अधिक स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा : “… मोठे दुष्परिणाम होण्याची भीती”; Iran Israel युद्धावर पंतप्रधान मोदींचे मोठे भाष्य

मानवत तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी बालाजी कुन्हाडे आणि इतर सदस्यांचा नियुक्त्तीचा आदेश २० मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढला मात्र त्याचदिवशी जिल्हाधिकाऱ्याने तातडीने या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याने हा आनंद औट घटकेचा ठरला आहे.

समन्वयाचा प्रश्न
शिवसेना शिंदे गटाने भाजपच्या माध्यमातून नियुक्त्या मंजूर करून घेतल्या, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. राजेश विटेकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्या प्रक्रियेला स्थगिती मिळवली. आगामी काळात या नियुक्त्यांवर अंतिम निर्णय घेताना तिन्ही पक्षांतील अंतर्गत समन्वय किती प्रभावी राहतो.

Web Title: Politics on chairperson and members of the sanjay gandhi destitute committee in manvat taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Nanded
  • nanded news
  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
3

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.