
महाराष्ट्रात हवेचा दर्जा बिघडला (फोटो सौजन्य - iStock)
मुंबई/राम खांदारे: राज्यातील सर्वच शहरांमध्ये धूलिकणांची (पीएम) पातळी राष्ट्रीय मयदिपेक्षा जास्त असून मुंबई आणि एमएमआर परिसरातील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर गेली आहे. असे ‘वातावरण फाऊंडेशन’ आणि ‘एन्वारोकॅटलिस्ट’ यांच्या संयुक्त अहवालातून समोर येत आहे. दरम्यान, वायू प्रदूषणाच्या संकटात महाराष्ट्रातील सर्व शहरांचा समावेश झाल्याने चिंता वाढली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गेल्या आठ वर्षांच्या आकडेवारीवर आधारित या अहवालानुसार महाराष्ट्रातील १७ शहरांनी पीएम२.५ (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) मर्यादा ओलांडली असून सर्व शहरांमध्ये पीएम १० ची पातळी ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकां’ पेक्षा
अधिक आहे.
मुंबई आणि एमएमआर : निधी असूनही प्रदूषण कायम
९३८.५९
‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’
५७४.६४
कोटी रुपये केवळ वापरले.
वायू प्रदूषण हे केवळ पर्यावरणाचे नव्हे तर सार्वजनिक आरोग्याचे संकट आहे. धोरणे आहेत, पण अंमलबजावणीत मोठ्या विसंगती दिसतात – भगवान केसभट, सीईओ, वातावरण फाऊंडेशन
एमएमआर रिजनमधील उपनगरे काळवंडली
ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण, उल्हासनगर, विरार आणि बदलापूर या एमएमआरमधील शहरांची परिस्थितीही धोकादायक आहे. नवी मुंबईत पीएम १० पातळी १०२ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचली असून गेल्या पाच वर्षांत यात सुमारे दुप्पट वाढ झाली असल्याचे अहवालात आहे, तर ठाण्यात पीएमर ५ प्रदूषक ३८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० है ८३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर एवढे झाले आहे.
बांधकाम आणि वाहतुकीतील धूळ हे कारणीभूत घटक मानले जात आहेत. मीरा-भाईंदर आणि विरारमध्ये पीएम२.५ हे ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त असून उपनगरांतील हवा महानगराइतकीच प्रदूषित असल्याचे स्पष्ट होते, बदलापूर, भिवंडी आणि बेलापूरमध्ये पीएम १० पातळी १०० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त होत जाऊन हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी धोकादायक. पातळीवर पोहचते.
इशारा महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमध्ये
धूलिकणांची पातळी धोकादायक आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमच्या मर्यादपलीकडे जाऊन प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना राबवण्याची वेळ आली असल्याचे एन्यारोकॅटलिस्टचे संस्थापक सुनील दहिया यांनी इशारा दिला आहे.
मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला; केंद्राकडून इशारा, पुढील वातावरण प्रदूषित राहणार
मुख्य शिफारसी
मुंबईतील हवेचा दर्जा 4 वर्षात 22 टक्क्यांनी खालावला; तात्काळ केला पाहिजे दीर्घकालीन सोलुशन्सचा अवलंब