Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भाजपबरोबर राहिलेत त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये”; प्रकाश आंबेडकरांची संजय राऊतांवर बोचरी टीका

Prakash Ambedkar : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर आता सर्व पक्षांनी जोरदार तयारी केलेली असताना, महाविकास आघाडीनेसुद्धा आता तिन्ही पक्षांची मोट बांधत वंचितसारख्या घटक पक्षांना सोबत घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. आता प्रकाश आंबेडकरांनी यावर संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधत, आम्हाला शिकवण्याची गरज नाही. असा टोला लगावला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Mar 19, 2024 | 09:00 PM
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Follow Us
Close
Follow Us:

अकोला : वंचित बहुजन आघाडी (Vanchit) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा (Seat Sharing तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे वंचित महाविकास आघाडी सामील होण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. भाजपाबरोबर राहिलेत त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला. वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याला पाठिंबा देणार असल्याच्या राऊतांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरेंशी कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट
गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसने माझ्याविरोधात मुस्लिम उमेदवार दिला आहे, असे झाल्याने काँग्रेसचा जनाधार कमी झाल्याचे अकोल्यातील मुस्लिम समाजाचे मत, यावेळी असे झाले तर मुस्लिमांचे मत असेच राहील, असे आंबेडकरांनी म्हटले आहे. चंद्रहार पाटलांवरून उद्धव ठाकरेंशी कोणतेही मतभेद नसल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.

पक्ष आणि आंबेडकरांची मतमतांतरे
मी पक्षाने सांगितलं तसेच निर्णय घेतो. पक्षाच्या आदेशाने काम करतो. माझ्या मताने झाले असते, तर कधीचाच निर्णय घेतला असता. युतीला विलंबाबत पक्ष आणि आंबेडकरांचे मत-मतांतरे आहेत का, असा प्रश्न निर्माण करणारे हे आंबेडकरांचं वक्तव्य आहे.

महाविकास आघाडीतील पक्षांत भांडणे
महाविकास आघाडी सोबतच्या युतीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं की, महाविकास आघाडीतील पक्षांत भांडणे आहेत, तेच भांडण मिटवत नाहीत. त्यांनी दिलेला तीन जागेचा प्रस्ताव आम्ही फेटाळून लावला आहे. भाजपला हरवण्यासाठी जी पाऊले उचलायला लागतील ती आम्ही उचलणार, असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे.

वंचितचा 7 जागांचा प्रस्ताव
सात जागांचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसकडे दिला आहे. मल्लिकार्जुन खरगेंना आम्ही एक पत्र लिहिलं आहे. महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत 10 जागांवरती काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. पाच जागा शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आघाडीसंदर्भात आमचं काही मत नाही. आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस त्यावर निर्णय घेईल.

शेवच्या क्षणापर्यंत ऑफर कायम राहिल
आमची ऑफर शेवच्या क्षणापर्यंत कायम राहिल. अखेरच्या दिवसापर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. संजय राऊतांवर निशाणा साधला आंबेडकरांनी म्हटलं आहे की, आधी भाजपसोबत राहिलेल्या संजय राऊतांनी त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये.

Web Title: Prakash ambedkars criticism of sanjay raut they said stay with bjp lets them not teach us wisdom nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2024 | 09:00 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Prakash Ambedkar
  • Vanchit
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?
1

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Local Body Election:  मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्ही पुरावे दिले…; महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट
2

Local Body Election: मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्ही पुरावे दिले…; महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

मनसेचे महाविकास आघाडीसोबत जुळले सूर? निवडणूक आयोगाला निवेदन देत केले ‘हे’ सहा प्रश्न
3

मनसेचे महाविकास आघाडीसोबत जुळले सूर? निवडणूक आयोगाला निवेदन देत केले ‘हे’ सहा प्रश्न

Local Body Election: महाविकास आघाडीचे प्रमुख नेते घेणार निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, राज ठाकरेही उपस्थित राहणार
4

Local Body Election: महाविकास आघाडीचे प्रमुख नेते घेणार निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, राज ठाकरेही उपस्थित राहणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.