Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Surve Statements: ‘मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल..’; वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वेंचा जाहीर माफीनामा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 04, 2025 | 02:57 PM
Prakash Surve Statements: ‘मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल..’; वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वेंचा जाहीर माफीनामा
Follow Us
Close
Follow Us:
  • मराठी माझी आई, उत्तर भारतीय माझी मावशी, आई मेली तरी चालेल- प्रकाश सुर्वे
  • प्रकाश सुर्वे यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल
  • हे वक्तव्य अतिशय लाजिरवाणं आणि लाचार – अमित ठाकरे

 

Prakash Surve Statements: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी विरूद्ध हिंदी अशी वादाची ठिणगी पडली होती. त्यावळी काही नेत्यांनी मराठी विरूद्ध उत्तर भारतीय असेही चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं एक वादग्रस्त विधानाने नव्या वादाची ठिगणी पडली.  त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला असता प्रकाश सुर्वे यांनी माफी मागितली आहे.

बोगस मतदारांविरोधात कारवाईसाठी 27 दिवसांचे आधी धरणे आंदोलन; आता बेमुदत उपोषण

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीने उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना सुर्वे म्हणाले, “मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी. आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको, कारण मावशी जास्त प्रेम करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही दिले आहे. हे प्रेम असंच ठेवा,” असे त्यांनी सांगितले. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सुर्वे यांच्या विधानावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर टीका करत “मराठी अस्मितेचा अपमान” असा आरोप केला आहे, तर सुर्वे समर्थकांनी त्यांचे वक्तव्य “राजकीय संदर्भात घेतले पाहिजे” असे सांगितले.

आमदार सुर्वे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे नेत्यांसह विरोधी महाविकास आघाडीनेही प्रकाश सुर्वे यांच्यावर टीका केली. त्यानंतर प्रकाश सुर्वे यांना उपरती झली आणि त्यांनी माफी मागितली. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत त्यांनी एक पत्रकार परिषद घेत त्यांनी जाहीर माफी मागितली.

Baramati Politics: बारामतीत पडद्यामागे घडामोडींना वेग; पवार घराण्याचा नवा खेळाडू निवडणुकीच्या रिंगणात

सुर्वे म्हणाले, मराठी आमची मायमाऊली आहे. अनावधानाने माझ्या तोंडातून तसे शब्द निघून गेले. त्यासाठी मी हात जोडून माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. उदय सामंत यांनीदेखील त्यांच्या तोंडून चुकीने तसे शब्द निघून गेले, असल्याचे स्पष्ट केले. पण मनसे नेत अमित ठाकरे मात्र चांगलेच संतापले होते.

अमित ठाकरे म्हणाले, “‘माय मरो, मावशी जगो’ हे वक्तव्य अतिशय लाजिरवाणं आणि लाचार आहे. ‘माय’ म्हणजे महाराष्ट्र आणि ‘मावशी’ म्हणजे उत्तर प्रदेश. अशा प्रकारे बोलणे एका आमदाराला शोभणारे नाही. माफी मागून काही होणार नाही, कारण माफ करणं हे माझ्या हातात नाही, तर मराठी माणसांच्या हातात आहे. निवडणुकीतच त्यांना याचे उत्तर मिळेल. आमच्या पक्षातील कोणाकडून असं वक्तव्य झालं असतं, तरी आम्ही त्याचाही निषेध केला असता, प्रकाश सुर्वे यांनी केलेली चूक गंभीर आहे आणि अशी चूक पुन्हा होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या वक्तव्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला असून, मुंबईतील आगामी स्थानिक निवडणुकीत या विषयावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“मराठी माझी आई आहे पण उत्तर भारतीय माझी मावशी आहे… माय मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी मरता कामा नये.. कारण मावशी माझ्यावर जास्त प्रेम करते.. ” हे विधान आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं… वा सुर्वे तुम्ही तुमच्या मराठी द्वेषावर चांगला ‘प्रकाश’… pic.twitter.com/zGMGys3FZ4 — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 3, 2025

Web Title: Prakash surves public apology after making controversial statements about the marathi language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • amit thackeray
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Shivsena News: शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत…? नेमकं काय आहे कारण
1

Shivsena News: शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत…? नेमकं काय आहे कारण

Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट
2

Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट

Maharashtra Politics: महायुती तुटणार? “… त्यांचे उपकार विसरू नका”; NCP चा आमदार थोरवेंना इशारा
3

Maharashtra Politics: महायुती तुटणार? “… त्यांचे उपकार विसरू नका”; NCP चा आमदार थोरवेंना इशारा

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेनेचा ‘दगाबाज रे’ अभियान
4

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेनेचा ‘दगाबाज रे’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.