बारामतीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जय पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
Baramati Politics: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारीही सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जय पवार हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात.
मात्र, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीदेखील जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे. स्थानिक स्तरावर याला “पवार घराण्याच्या नव्या पिढीची राजकीय एन्ट्री” म्हणून पाहिले जात आहे.
ICC ने Women’s Cricket World Cup संघाची केली घोषणा, कर्णधार हरमनप्रीत कौरला टीममधून वगळले
अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा दणकूण पराभव झाला. यानंतर अजित पवार त्यांच्या दोन्ही पुत्रांना निवडणुकीच्य रिंगणात उतरवणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. पण विधानसभा निवडणुकीतही पार्थ पवार आणि जय पवार आघाडीवर होते. बारामतीच्या राजकारणत ते बऱ्याच दिवसांपासून सक्रीय आहेत. त्यामुळे यावेळी बारामती नगर परिषेद निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांचा कल राजकारणापेक्षा उद्योग-व्यवसायाकडे अधिक आहे. काही काळ त्यांनी दुबईमध्ये व्यवसाय केला असून सध्या ते मुंबई आणि बारामती येथे विविध व्यवसाय सांभाळत असल्याचे सांगितले जाते.
जय पवार हे सक्रिय राजकारणात जरी फारसे दिसत नसले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरल्यावर जय पवार यांनी आईच्या प्रचारासाठी राजकीय रणांगणात पाऊल टाकले. ‘पवार विरुद्ध पवार’ अशा झालेल्या लढतीत त्यांनी आईच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोठे भाऊ पार्थ पवार हे उमेदवार असतानाही जय पवार प्रचारात सक्रिय होते. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेवरील निवडीनंतर जय पवार यांनी बारामतीतील जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जय पवार यांनी राजकारणाकडे अधिक गांभीर्याने वळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात जोमाने रंगू लागली आहे.