Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्ष नंतर… कोकण आधी!’ प्रशांत पवारांची संतप्त फेसबुक पोस्ट व्हायरल; महामार्गाच्या दुरवस्थेवर लोकप्रतिनिधींना थेट सवाल!

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर उद्योजक प्रशांत पवार यांनी संतप्त फेसबुक पोस्ट केली आहे. ‘आश्वासने नकोत, कृती हवी’ म्हणत त्यांनी कोकणातील लोकप्रतिनिधींना थेट सवाल केला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 13, 2026 | 09:38 PM
Mumbai Goa Highway

Mumbai Goa Highway

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीवर प्रशांत पवारांची संतप्त पोस्ट.
  • ‘आश्वासने नकोत, कृती हवी’ म्हणत लोकप्रतिनिधींना थेट सवाल.
  • ‘पक्ष नंतर… कोकण आधी’ म्हणत कोकणाच्या एकजुटीचा मुद्दा चर्चेत.

शिरगाव, प्रतिनिधी – निसार शेख : गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेने पुन्हा एकदा कोकणवासीयांचा संताप उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योजक वामनराव पवार यांचे सुपुत्र तथा उद्योजक प्रशांत पवार यांनी फेसबुकवर केलेली संतप्त पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि प्रवासातील अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाही अनेक ठिकाणी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या परिस्थितीवर प्रशांत पवार यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे.

“वाहतूक पोलीस विभाग नेमके काय करत आहे? महाराष्ट्रातील मंत्री, आमदार आणि खासदारांकडे या परिस्थितीचे काय उत्तर आहे?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे.

केवळ आश्वासनांच्या राजकारणावर नाराजी व्यक्त करताना “फक्त आश्वासने नकोत, आता प्रत्यक्ष कृती हवी,” अशी स्पष्ट भूमिका प्रशांत पवार यांनी मांडली आहे. रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Accident News: कोकणात गणेशभक्तांच्या वाहनाचा चक्काचूर; ८ ते १० जण गंभीर, गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघाले अन् …

जयेंद्र साळगावकरांची कमेंट; ‘कोकणी जनता एकजूट दाखवत नाही’

प्रशांत पवार यांच्या या पोस्टवर ‘कालनिर्णय’चे संपादक जयेंद्र साळगावकर यांनी केलेली कमेंटही चर्चेत आली आहे.

“कोकणाकडे खास लक्ष कोण देत नाहीत… आणि कोकणी जनता एकजूट दाखवत नाहीत,” असे म्हणत साळगावकर यांनी कोकणातील जनतेच्या एकजुटीचा मुद्दा उपस्थित केला.

कोल्हापुरातील जनतेने पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून टोलविरोधात एकत्रित लढा दिल्याचा दाखला देत कोकणातही पक्षभेद विसरून जनतेने आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपण सहा-सात वर्षांपूर्वी याच प्रश्नावर आवाज उठवला होता आणि त्यावेळी आपली भूमिका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती; मात्र अपेक्षित प्रमाणात कोणी पुढे आले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

प्रशांत पवारांचे सडेतोड उत्तर

जयेंद्र साळगावकर यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना प्रशांत पवार यांनीही कोकणाच्या प्रश्नांसाठी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकजूट होण्याची वेळ आल्याचे स्पष्ट केले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर वर्षानुवर्षे आश्वासने मिळत आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महामार्ग पूर्ण करण्याबाबत अनेकदा आश्वासने दिली; मात्र सरकारे बदलली, पक्ष बदलले, सत्ता आली-गेली, पण महामार्गाचा प्रश्न मात्र कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

“कोकणातील जनतेने एकत्र येऊन आपल्या लोकप्रतिनिधींना — आमदार आणि खासदारांना — थेट प्रश्न विचारला पाहिजे. कोकणासाठी ठोस कृती का होत नाही?” असा सवाल प्रशांत पवार यांनी केला.

‘लोकप्रतिनिधी काम करत नसतील तर पर्यायाचा विचार करा!’

ही भूमिका कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करताना प्रशांत पवार यांनी “कोकणाच्या बाजूने उभा राहणारा आवाज आता बुलंद झाला पाहिजे,” असे म्हटले आहे.

विद्यमान लोकप्रतिनिधी कोकणाचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकत नसतील, तर पर्यायाचा विचार करण्याची वेळ आली आहे, असा थेट इशाराही त्यांच्या प्रतिक्रियेतून देण्यात आला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त

गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालेला असतानाच प्रशांत पवार यांच्या या पोस्टमुळे कोकणातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींची भूमिका यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

आता कोकणातील जनता या मुद्द्यावर एकजूट होणार का? लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारला जाणार का? आणि वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न कायमस्वरूपी कधी सुटणार? हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

प्रशांत पवारांचा स्पष्ट नारा —

  • “पक्ष नंतर… कोकण आधी!
  • आश्वासने नकोत… कृती हवी!
  • आवाज झाला पाहिजे… आणि तो एकजुटीचा झाला पाहिजे!”

Web Title: Prashant pawar konkan mumbai goa highway road condition facebook post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • Kokan News
  • Mumbai Goa Express Way

संबंधित बातम्या

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी
1

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त
2

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
3

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद
4

गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.