Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NAREDCO सारख्या संस्थांनी एसटीच्या पुनरुत्थनांमध्ये योगदान द्यावे, प्रताप सरनाईक यांचे आवाहन

एसटीच्या लँड बँकचा विकास करण्यासाठी नॅरेडकोसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या अनुभवाचा फायदा एसटी महामंडळासारख्या सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देखील करून द्यावा.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 12, 2025 | 03:30 PM
NAREDCO सारख्या संस्थांनी एसटीच्या पुनरुत्थनांमध्ये योगदान द्यावे, प्रताप सरनाईक यांचे आवाहन (फोटो सौजन्य-msrtc)

NAREDCO सारख्या संस्थांनी एसटीच्या पुनरुत्थनांमध्ये योगदान द्यावे, प्रताप सरनाईक यांचे आवाहन (फोटो सौजन्य-msrtc)

Follow Us
Follow Us:

St Mahamandal: राज्यभरात मोक्याच्या ठिकाणी पसरलेल्या एसटीच्या ” लँड बँक” चा विकास करण्यासाठी नॅरेडको (National Real Estate Development Council) सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या अनुभवाचा फायदा एसटी महामंडळासारख्या सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देखील करून द्यावा! असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले . ते जिओ वर्ल्ड कनव्हेशन सेंटर (BKC) येथे या संस्थेच्या वार्षिक समिटमध्ये उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष हरिबाबू ,राजन बांदेकर,निरंजन हिरानंदानी, जय मोरझारीया व देशभरातील विकासक – उद्योजक उपस्थित होते.

“एका रस्त्यावर दहा गणपती… हा श्रद्धेचा नाही तर खेळाचा भाग…”; माघी गणेशोत्वसाच्या वादावरुन प्रकाश आंबेडकरांचे स्पष्ट मत

एसटीची राज्यभरात ८४० पेक्षा जास्त ठिकाणी सुमारे ३००० पेक्षा जास्त एकराची ” लँड बँक ” आहे. ती प्रामुख्याने जिल्हा, तालुका आणि ग्रामीण अशा तीन गटांमध्ये आपण विभागलेली आहे. या जमिनीचा एकत्रित विकास करण्यासाठी एस टी महामंडळ लवकरच निविदा प्रक्रिया राबत आहे. तथापि मोठ्या शहरातील मोक्याच्या जागांसाठी विकासक मोठ्या संख्येने इच्छुक असतात. परंतु तालुका आणि ग्रामीण भागासाठी तितक्या प्रमाणात विकासक इच्छुक नसतात. हे ओळखून या निविदा प्रक्रियेमध्ये एक मोठ्या शहरातील मोक्याची जागा तसेच तालुका आणि ग्रामीण क्षेत्रातील इतर जागांसह संयुक्तपणे निविदा प्रक्रिया राबवण्याचा विचार असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

तसेच विकासकाबरोबर एसटीचा देखील फायदा होईल, अशा निविदा प्रक्रियेमध्ये विकासकांना त्यांच्या आवडीच्या भूखंडाबरोबरच इतर दोन भूखंड देखील विकसित करणे आवश्यक असेल, त्यामुळे एसटीच्या इतर मोकळ्या जागेचा देखील विकास होऊ शकतो. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.” भविष्यात एसटीच्या जास्तीत जास्त जमिनीचा खाजगी – सार्वजनिक भागीदारीतून विकास व्हावा आणि त्यातून प्रीमियमच्या स्वरूपामध्ये एसटीला चांगला निधी उपलब्ध व्हावा, तसेच एसटीची बसस्थानके, आगार व इतर आस्थापना बांधून घेणे यासाठी ” नॅरेडको ” सारख्या संस्था पुढे आल्या पाहिजेत! ” असे आवाहन यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Rajan Salvi News: एकनाथ शिंदेचं ‘मिशन टायगर ‘ कामयाब; ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र,’ राजन साळवी हाती धनुष्यबाण घेणार

Web Title: Pratap sarnaik urges organisations like naredco to contribute to revival of st mahamandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
1

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
2

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
3

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
4

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.