Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Ambulance: एअर ॲम्ब्युलन्स सेवेला मिळणार नवी दिशा; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश, प्रताप सरनाईक यांची माहिती

Air Ambulance: महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवेसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या पुढाकाराने सात सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला दोन महिन्यांत शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 23, 2026 | 01:17 PM
एअर ॲम्ब्युलन्स सेवेला मिळणार नवी दिशा; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश, प्रताप सरनाईक यांची माहिती

एअर ॲम्ब्युलन्स सेवेला मिळणार नवी दिशा; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश, प्रताप सरनाईक यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवेसाठी प्रमाणित कार्यपद्धती ठरणार!
  • ॲम्ब्युलन्स सेवेत मोठा बदल होणार
  • परिवहन विभागाकडून सात सदस्यीय समिती गठित
 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स व नवीन ॲम्ब्युलन्स सेवांचे संचालन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedure – SOP) तयार करण्यासाठी परिवहन विभागाने सात सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीने शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.(Air Ambulance)

ॲम्ब्युलन्स सेवेत मोठा बदल होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवांसाठी स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. या बैठकीतील निर्णयानुसार परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत SOP तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शासनाने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून या समितीची अधिकृत स्थापना केली आहे.

Fake Police Robbery: ६० लाखांची रोकड कोठून आली अन् रचलं कोणी षडयंत्र? बनावट पोलीस लूट प्रकरणात मुंबई पोलिसांचा सखोल तपास सुरू!

या समितीच्या अध्यक्षपदी परिवहन आयुक्त कार्यालयातील अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) श्रीमती मोक्षदा पाटील, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयातील पोलीस अधीक्षक सुनील भारद्वाज, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग, उपसंचालक जयंत मुळे आणि परिवहन आयुक्त कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षाचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद तावडे यांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षाचे परिवहन उपायुक्त सचिनकुमार गिरी हे समितीचे सदस्य-सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याची जबाबदारी

महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स तसेच नवीन ॲम्ब्युलन्स सेवांबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. समितीने विविध बाबींचा अभ्यास करून शासनाला आवश्यक त्या शिफारशींसह अहवाल सादर करायचा आहे. शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत हा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवांच्या नियोजनबद्ध संचालनासाठी एकसमान प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. परिवहन आणि सार्वजनिक आरोग्य विभागासह पोलीस विभागाच्या समन्वयातून या सेवांसाठी आवश्यक नियमावली आणि कार्यपद्धती विकसित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Navi Mumbai News: आधुनिक नवी मुंबईत संस्कृतीचा वारसा कायम; तुर्भेसह विविध गावठाणांत तुळशी विवाह साजरा

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रात कोणत्या ॲम्ब्युलन्स सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित होणार आहे?

    Ans: राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे.

  • Que: ॲम्ब्युलन्स सेवेसाठी किती सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे?

    Ans: परिवहन विभागाच्या पुढाकाराने सात सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

  • Que: समितीला शासनाकडे अहवाल सादर करण्यासाठी किती कालावधी देण्यात आला आहे?

    Ans: समितीला दोन महिन्यांच्या आत शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 

Web Title: Maharashtra air ambulance new ambulance services standard operating procedure committee sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Air Ambulance
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Yavatmal News: टिपेश्वर अभयारण्यात नियमांची पायमल्ली! परिसरात १० कॉटेजची परवानगी, प्रत्यक्षात १५ उभारले
1

Yavatmal News: टिपेश्वर अभयारण्यात नियमांची पायमल्ली! परिसरात १० कॉटेजची परवानगी, प्रत्यक्षात १५ उभारले

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू
2

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे Mira Bhayandarसाठी योगदान काय?
3

भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे Mira Bhayandarसाठी योगदान काय?

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई
4

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.