Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न’; विद्यार्थी आंदोलनावरून प्रवीण दरेकरांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

Pravin Darekar on Thackeray brothers: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय अस्तित्व टिकवण्याचा काही पक्षांचा प्रयत्न असल्याची टीका करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 25, 2026 | 08:54 PM
‘राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न’; विद्यार्थी आंदोलनावरून प्रवीण दरेकरांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
  • प्रवीण दरेकरांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
  • ठाकरे बंधूंची विश्वासार्हता संपली
कराड: विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष स्वतःचे संपुष्टात येत असलेले राजकीय अस्तित्व वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करून भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता ओळखते, अशी टीका भाजपचे गटनेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार

बेलदरे, (ता. कराड) येथे दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताह तसेच ‘हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत देशी गोसंवर्धन व वृक्षारोपण अभियानाच्या कार्यक्रमानंतर आमदार दरेकर यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, अजय पावसकर, एकनाथ बागडी, राहुल यादव, मुकुंद चरेगावकर, शिवाजी जाधव, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार दरेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोणालाही सोडणार नाही’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. मात्र, काही राजकीय पक्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेत स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोण आंदोलनात आगीत तेल ओतत आहे आणि कोण खतपाणी घालत आहे, हे जनतेला स्पष्टपणे दिसत आहे. जनता सुज्ञ असून ती योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.

ठाकरे बंधूंवर टीका करताना दरेकर म्हणाले, बैल गेला अन् झोपा केला, या म्हणीप्रमाणे ठाकरे बंधू सगळे झाल्यानंतर जागे होतात. त्यांच्या भूमिकांमुळे विश्वासार्हतेला तडा गेला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? अशी टिपण्णी त्यांनी केली.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केल्याचेही दरेकर यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि पुढील १० ते १५ वर्षे महाराष्ट्राला त्यांचे नेतृत्व लाभावे, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली आहे, असे त्यांनी नमूद केले.

CJP Pune Protest: ‘पेपर अभी झाकी है ‘ईव्हीएम’…’; प्रधानांचा राजीनामा अन् मेलोडी वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष

Web Title: Pravin darekar criticizes thackeray brothers over student protest maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • MLA Pravin Darekar
  • Raj Thackeary
  • Uddhav Thackaray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.