Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी; 1894 ठरावांनंतर मतदारयादीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष

प्रशासकीय स्तरावर ठराव स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 06, 2026 | 08:44 AM
अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार निश्चित करण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी ठराव दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात एकूण १८९४ ठराव प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे आता निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर पुढील टप्प्यात प्रवेश करत असून, राजकीय घडामोडींनाही अधिक वेग आला आहे.

यंदाच्या निवडणुकीत २१ संचालक पदांसाठी मतदान होणार असून, त्यापैकी पाच जागा राखीव आहेत. उर्वरित जागांसाठी विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींमधून संचालकांची निवड होणार आहे. विशेषतः विकास सेवा सोसायट्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदार असल्याने या ठिकाणी ठराव मिळविण्यासाठी विविध राजकीय गटांनी मोठी ताकद पणाला लावली.

४ ऑगस्टअखेर विकास सेवा सोसायट्यांकडून ९५५ ठराव दाखल झाले होते. त्यामध्ये सातारा (१४६), कराड (१४५), फलटण (१३९), पाटण (१०४), खटाव (१०१), कोरेगाव (८७), माण (७५), वाई (५९), खंडाळा (४९), जावळी (४८) आणि महाबळेश्वर (११) या तालुक्यांचा समावेश आहे. याशिवाय कृषी उत्पादन प्रक्रिया व सहकारी साखर कारखाने, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका व पतसंस्था, गृहनिर्माण व दूध संस्था तसेच इतर सहकारी संस्थांचे मिळून ९३९ ठराव दाखल झाल्याने एकूण संख्या १८९४ वर पोहोचली.

ठराव दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला. काही भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला. जावळी तालुक्यातील एका ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले, तर कराड आणि माण तालुक्यातही ठराव प्रक्रियेदरम्यान वादग्रस्त घडामोडी घडल्याची चर्चा होती. काही घटनांची पोलिसांकडे नोंदही करण्यात आली आहे.

या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीन पाटील, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, मनोज घोरपडे, डॉ. अतुल भोसले आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या गटांची प्रतिष्ठा या निवडणुकीशी जोडली गेली आहे. त्यामुळे उमेदवारी, गटबांधणी आणि मतदारांवरील प्रभाव या अनुषंगाने आगामी काळात राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

प्रशासकीय स्तरावर ठराव स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. त्यानंतरच निवडणुकीच्या पुढील कार्यक्रमाला अधिकृत सुरुवात होणार असल्याने सहकार क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या प्रक्रियेकडे लागले आहे.

ठळक मुद्दे

एकूण प्राप्त ठराव : १,८९४
विकास सेवा सोसायट्यांचे ठराव : ९५५
संचालक पदे : २१
राखीव जागा : ५
पुढील टप्पा : प्रारूप मतदार यादी, हरकती व अंतिम मतदार यादी प्रसिद्धी

Satara News : भुयारी गटार योजनेच्या ठरावावरून सातारा पालिकेत खळबळ; ठेकेदाराला मुदतवाढ दिल्यास कायदेशीर लढ्याचा सुशांत मोरेंचा इशारा

Web Title: Preparations for the satara district bank election have begun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
1

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान
3

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव
4

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.