Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा‌, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

 सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल! त्या अनुषंगाने ६०० कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2025 | 03:30 AM
प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा‌, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा‌, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : कापुरबावडी ते घोडबंदर मार्गावरील ८ मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत. जेणेकरून प्रवाशांना मेट्रो मधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्या. मेट्रो स्थानके व त्या अनुषंगिक विविध विकास कामांच्या पहाणी दौऱ्याच्या अनुषंगाने बोलत होते. यावेळी ठाणे महापालिका , मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण , वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 ठाण्यातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, ५-६ वर्षापूर्वी ठाणे मेट्रो चे काम सुरू झाले, तेव्हा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता. परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल! त्या अनुषंगाने ६०० कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. सदर काम पावसाळ्यानंतर सुरू करून या वर्षाअखेरीस पूर्ण करावे अशा देखील सूचना मंत्री सरनाईक यांनी या वेळ केल्या. तथापि ,सेवा मार्ग व मुख्य रस्ता याच्या मधोमध मेट्रोचे स्थानकाचे जिने उतरत असल्यामुळे ते भविष्यात प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील, अशा तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या.

या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन केले होते. सध्या सेवा मार्ग मुख्य रस्त्याशी जोडला जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढलेली आहे. परंतु जिथे मेट्रो स्थानक आहे, तेथे प्रवासी उतरण्या च्या जिन्यालगत प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे सदर सेवा मार्ग हा त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा अशी मागणी पुढे आली. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवा मार्ग आरक्षित करून तेथे प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून एसटी बस, शहर बस आणि रिक्षा व टॅक्सी या वाहनाखेरीज इतर वाहने या मार्गावरून येऊ नयेत. अशा प्रकारचे सूचनाफलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावेत! अशा देखील सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उपरोक्त सूचनाचे अनुषंगाने केलेले बदल वाकथ्रू च्या माध्यमातून १५ ऑगस्ट पर्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपणास दाखवण्यात यावेत व त्यांच्या अनुमतीने पुढील काम सुरू करावे असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करा

दरम्यान मेट्रोस्थानके व त्या अनुषंगाने इतर कामाची पाहणी मंत्री सरनाईक यांनी केली.यावेळी संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसे पत्र ठाणे महापालिकेने संबंधिताना द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.

पोषण आहार आधी मुख्याध्यापक अन् शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार; विषबाधा टाळण्यासाठी नवा नियम

Web Title: Prepare a reserved passenger waiting area under each metro station as directed by transport minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 03:30 AM

Topics:  

  • Metro
  • pratap sarnaik
  • thane

संबंधित बातम्या

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
1

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
2

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
3

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
4

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.