
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
• ठाणे महापालिका निवडणूक निकालानंतर दोन राष्ट्रवादी गटांमध्ये तणाव
• अजित पवार गटाचे नेते प्रवीण पवार यांच्यावर मानेवर व चेहऱ्यावर वार
• मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
ठाणे: राज्यात सगळीकडे महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भांडण झाल्याची घटना आपण वाचली असेल. दोन गटात प्रचारादरम्यान आणि निकाल नंतर अनेक ठिकाणी राडे झाले. ठाणे महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागल होत कारण या जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची ताकद मोठी आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळाल्या. मात्र अजित पवार गटाच्या नेत्यावर मात्र निकालानंतर जीवघेना हल्ला करण्यात आला अहे. मनीषा पवार यांनी प्रभाग ३१ मधून निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर दोन गटात वाद झाल्याची माहिती होती. मात्र प्रवीण पवार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी लढली एकमेकांच्या विरोधात झाला राडा
प्रवीण पवार यांच्या पत्नीच्या विरोधात शिवा जगताप यांनी निवडणूक लढवली होती. या दोघांमध्ये वाद झाले होते. प्रवीण पवार यांच्या पत्नीच्या या प्रभागात पराभव झाला होता. मात्र प्रवीण पवार यांनी शिवा जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवा जगताप यांच्या भावाकडून मला मारहाण करण्यात आली आहे. आप्पा जगताप यांचे कार्यकर्ते यांनी मला मारहाण केली आणि हल्ला करून तिथून त्यांनी पळ काढला.
धारदार शस्त्राने केला हल्ला मानेवर आणि चेहऱ्यावर दिला मार
आप्पा जगताप यांच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप प्रवीण पवारांचा आहे. त्यांच्यावर हल्ला केल्यावर हल्लेखोर काय थांबले नाहीत. तिथून त्यांनी लगेच पळ काढला. प्रवीण पवार हे पोलीस तक्रार देण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी तक्रार दिल्यावर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. मात्र ठाण्यात प्रभाग ३१ मध्ये दोन राष्ट्रवादी मध्येच आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यावर हल्ला झाल्याने राजकीय चर्चा विषय ही घटना झाली आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.
‘त्या’ बेपत्ता तरुणाची आत्महत्या; खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Ans: अजित पवार गटाचे नेते प्रवीण पवार यांच्यावर हल्ला करण्यात आला.
Ans: महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटांतील वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप आहे.
Ans: मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून हल्लेखोरांचा शोध आणि तपास सुरू आहे.