
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमक?
२३ वर्षीय फर्जाना मन्सूरी ही मुंब्रा इथे राहते. ती आपल्या दोन मुलींसह बाजारात गेली होती. एक मुलगी तीन वर्षांची तर दुसरी मुलगी ही तीन महिन्यांची होती. बाजारात खरेदी केल्यानंतर ती घरी येत होती. त्यादरम्यान तिच्या मोठ्या मुलीने मला ही उचलून घे असा हट्ट धरला. त्याच वेळी तिच्या सोबत एक बुरखाधारी महिला होती. रस्ता ओलांडण्यासाठी मदत करते असं सांगत तिने फर्जानाकडील लहान बाळ आपल्या ताब्यात घेतलं. तिने रस्ता ओलांडला पण त्या बुरखाधारी महिलेने ओलांडला नाही. तिने तिथून रिक्षा पकडत पळ काढला. या घटनेनं त्या बाळाची आई हादरली. तिने थेट पोलीस स्थानक गाठले.
पोलीस ठाण्यात तिने अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांकडे काहीच लीड नव्हती. ती ज्या रिक्षातून पळून गेली त्याचा नंबर ही माहिती नव्हता. फक्त रिक्षाच्या मागे आई लिहिले होते. त्यावरून त्या रिक्षाचा शोध घेण्यात आला. रिक्षा चालकाची चौकशी केली असता त्या महिलेला आपण मुंब्रा रेल्वे स्थानकात सोडल्याचे सांगितले. त्यानंतर ती बुरखाधारी महिला बदलापूरच्या दिशेने गेल्याचे दिसले. त्यावर मुंब्रा ते बदलापूरपर्यंत सीसीटीव्ही चेक करण्यात आली. बदलापूरला जी महिला उतरली तिची चौकशी करण्यात आली. पण अपहरण करणारी ती महिला नव्हती.
आता पुन्हा पोलीस तपासाला नव्याने सुरु करावं लागलं. सीसीटीव्ही पुन्हा एकदा चेक केले गेले. त्यात त्यांना एक महिला दिसली. तिच्याकडे लहान बाळ होते. तिच्या सोबत एक पुरुष देखील असल्याचे समोर आले. काही वेळाने एक महिला तिला येऊन भेटून गेली. त्यांनतर अपहरण करणारी महिला आणि तिच्या सोबत असलेले पुरुष हे सीएसटीकडे गेले. ठाण्यानंतर ते गायब झाले. त्यांचा काही पत्ता लागला नाही.
पोलिसांनी जी महिला त्यांना स्टेशनवर भेटून गेली होती तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.1600 सीसीटीव्ही पडताळून पाहाण्यात आले. ती ज्या भागात राहत होती त्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते. तिथे खबऱ्यांच्या मदतीने पोलीस पोहोचले. त्यांनी त्या महिलेची चौकशी केली तेव्हा सगळे सत्य समोर आले आहे.
त्या महिलेने चौकशीत आपण स्टेशनला भेटायला गेलो होतो हे कबुल केलं. तिने लहान मुलीचे अपहरण केलं होते तिचे नाव खैरुन्निसा मुजीब मोहम्मद असे असल्याचे तिने सांगितले. तर मोहम्मद मुजिर गुलाब असं तिच्या पतीचे नाव असल्याचे सांगितले. आपल्याला आनंदाची बातमी द्यायची आहे म्हणून खैरुन्निसाने बोलवल्याचं तिने सांगितलं. त्यावेळी तिने बाळ दाखवलं. मग ती तिथून निघून गेली.
ती महिला अकोला येथील राहणार असल्याची माहिती त्या महिलेने दिली. त्यांनतर पोलिस अकोला येथे रवाना झाले. तिथून बाळासहीत अपहरण करणाऱ्या जोडप्याला अटक करण्यात आली. बाळाला सुखरूप पोलिसांनी महिलेला सोपवलं. चौकशीत कारण समोर आलं. दहा वर्षापासून बाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी हे बाळ पळवल्याचं कबुल केलं.
Ans: रस्ता ओलांडण्याच्या बहाण्याने बुरखाधारी महिलेने आईकडून बाळ घेतलं आणि रिक्षातून पळ काढला.
Ans: रिक्षा, रेल्वे स्थानकं आणि 1600 CCTV फुटेज तपासून खबऱ्यांच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचले.
Ans: आरोपी जोडप्याला दहा वर्षांपासून अपत्य नव्हतं, त्यामुळे बाळ पळवल्याचं त्यांनी कबूल केलं.