Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण; वढू बुद्रुकसह तुळापूर ग्रामस्थांची उपस्थिती

वढू बुद्रुक (ता. शिरुर)सह तुळापूर ग्रामस्थांना विश्वासात घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा अद्यावत करण्याचे काम सुरू असून नुकतेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 04, 2022 | 01:30 PM
छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण; वढू बुद्रुकसह तुळापूर ग्रामस्थांची उपस्थिती
Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : वढू बुद्रुक (ता. शिरुर)सह तुळापूर ग्रामस्थांना विश्वासात घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा अद्यावत करण्याचे काम सुरू असून नुकतेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

शिरुर लोकसभा मतदार संघातील विविध कामे व प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात १५ सप्टेंबरला बैठक झाली होती. या बैठकीतील शिरूर लोकसभेतील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्याकरिता माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसएमडब्ल्यू ड्वेलिंग पुणे संस्थेने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्याचे प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण केले.

संभाजी महाराजांचे स्मारकस्थळ तीर्थक्षेत्र व्हावे

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकस्थळ हे पर्यटन क्षेत्र न वाटता तीर्थक्षेत्र असावे, येणाऱ्या प्रत्येकाला महाराजांच्या संघर्षाची व शिवकालीन कालखंडाची पावलोपावली प्रचिती येऊन राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, महाराजांची बलिदान भूमी असल्याने मौजमजेची जागा न वाटता इतिहास तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन भव्य ऐतिहासिक आराखडा राबवावा अशा स्वरूपाच्या सूचना वढू आणि तूळापूर ग्रामस्थ, शिष्टमंडळ व धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीने केल्या.

वढू, तुळापूरला जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करा

तसेच वढू, तुळापूरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण होऊन आपटीजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम व्हावे, गायरान जागा ताब्यात घेताना ग्रामपंचायतीला प्रशासनाने विश्वासात घ्यावे, वढू स्मारकासाठीच्या जागेतील अडचणी दूर करून निधी वाढवून मिळावा या मागण्या ग्रामस्थांनी केल्या होत्या.

[blockquote content=”येत्या आठ दिवसात ग्रामस्थांनी आराखड्यात समाविष्ट करावयाच्या बाबी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग व माझ्याकडे द्याव्यात. जेणेकरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सादरीकरणवेळी महत्त्वाच्या बाबींचा आराखड्यात समावेश होऊ शकेल.” pic=”” name=”- शिवाजी आढळराव पाटील, माजी खासदार.”]

या बैठकीस बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समिती वढू बुद्रुकचे मिलिंद एकबोटे, सचिन भंडारे, तुळापूरचे माजी सरपंच माऊली शिवले, अमोल शिवले आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वढू बुद्रुक व तुळापूरला जोडणारे रस्ते व पुलांची कामे स्वतंत्रपणे अर्थसंकल्पातून हाती घेण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी करणार असल्याचे आढळराव पाटील सांगितले.

Web Title: Presentation of design of chhatrapati sambhaji maharaj memorial presence of tulapur villagers with vadhu budruk nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2022 | 01:30 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shikrapur

संबंधित बातम्या

Nanded News : मुक व्हिडीओतून शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; नांदेडच्या राजकारणात जोरदार रंगली चर्चा
1

Nanded News : मुक व्हिडीओतून शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; नांदेडच्या राजकारणात जोरदार रंगली चर्चा

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली
2

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
3

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर…; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
4

Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर…; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.