Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

सध्या शिंदे गटाकडे सात खासदार आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे सहा खासदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाने तयारी केली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 02, 2026 | 12:49 PM
Operation Tiger, Maharashtra Politics, Eknath Shinde, Shivsena Politics, Uddhav Thackeray Faction MPs,

Operation Tiger, Maharashtra Politics, Eknath Shinde, Shivsena Politics, Uddhav Thackeray Faction MPs,

Follow Us
Follow Us:
  • केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला (डिनर) ठाकरे गटाचे दोन खासदार,
  • नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण
  • ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे प्रत्येकी ६ खासदार फोडून पक्षाची ताकद वाढवण्याची रणनीती
Eknath Shinde Shivsena Opration Tiger: शिवसेना शिंदे गटाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या डिनर डिप्लोमसीसाठी ठाकरे गटाचे दोन खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनरसाठी ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर आणि खासदार संजय देशमुख उपस्थित होते. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळचे खासदास संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते.यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर, आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठी गेलो असल्याचे स्पष्टीकरण नागेश आष्टीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.

Maharashtra Politics : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन

यासंदर्भात बोलताना खासदार आष्टीकर म्हणाले की, प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीच कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी आम्हाला सभागृहातच विनंती केली होती. त्यासाठी आम्ही त्यांना फक्त शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो होतो. ५-१० मिनीटांसाठी भेटलो. याचा अर्थ आम्ही काही वेगळ्या चर्चा करण्यासाठी गेलो नव्हतो. काही बातम्या नसल्या की ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू होतात, पण त्यात काही तथ्य नाही. कोणाच्या सुख-दु:खात एकमेकांना भेटलं पाहिजे, असं मला वाटतं. आम्ही सर्वजण एकाच सभागृहातील आहोत त्यामुळे यात काही गैर नाही.

सध्या शिंदे गटाकडे सात खासदार आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे सहा खासदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाने तयारी केली होती. पण शरद पवार गटाचे ६ आणि ठाकरे गटाचे ६ खासदार फोडल्यास शिंदे गटाकडे १९ खासदार होती. या १९ खासदांराच्या बळावर राज्याच्या राजकारणात बार्गिनिंग पावर वाढवता येईल, महायुतीमध्ये शिवसेनेची (शिंदे गट) ताकद भाजपच्या तोडीस तोड करणे. आगामी लोकसभा निवडणुकीत किमान १९ जागांवर दावा ठोकण्यासाठी आतापासूनच भक्कम पाया रचण्याची रणनीती आखली होती.

Ahilyanagar Irrigation: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अहिल्यानगर, श्रीगोंद्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला

 

दिल्लीतून अद्याप ‘ग्रीन सिग्नल’ नाही

शिंदेंनी ही रणनीती आखली असली तरी, भाजप नेतृत्वाने याला अद्याप संमती दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली नसल्याचे समजते. पक्षांतर आणि फोडाफोडीच्या या नव्या मोहिमेला भाजपकडून सध्या ‘ग्रीन सिग्नल’ मिळालेला नाही, ज्यामुळे शिंदेंच्या या योजनेसमोर अडथळे निर्माण झाले आहेत.

राजकीय गणिते आणि पेच

ठाकरे आणि पवार गटाचे खासदार फोडल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो, मात्र भाजप स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शिंदेंना इतकी मोठी मोकळीक देणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी न होणे, हे या रणनीतीला मिळालेला थंड प्रतिसाद मानला जात आहे.

 

 

 

 

Web Title: Thackeray faction mps spotted at shinde camps dinner operation tiger rumors resurface

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Shivsena Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…
1

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
2

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
4

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.