Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : प्राचीन भारतीय शिक्षणाचा वारसा जपणे काळाची गरज! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Nagpur News : नागपुरात झालेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राचीन भारतीय शिक्षणाचा वारसा जपण्याचे आवाहन केले. मातृभाषेतील शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर आणि विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्ये रुजवण्यावर त्यांनी भर दिला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 24, 2026 | 08:29 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • तक्षशिला ते नालंदा; भारतीय शिक्षण व्यवस्थेचा गौरवशाली इतिहास
  • जनरेशन वॉव समोर माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे आव्हान
  • मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य; मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
Nagpur News : भारताची प्राचीन शिक्षण व्यवस्था ही जगासाठी ज्ञानाचा मोठा स्रोत होती. तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिलासारख्या विद्यापीठांमध्ये जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. या समृद्ध शैक्षणिक परंपरेचा वारसा जपणे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरातील मिहान येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) येथे आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

तक्षशिला ते नालंदा; भारतीय शिक्षण व्यवस्थेचा गौरवशाली इतिहास

भारतातील प्राचीन शिक्षण पद्धती केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नव्हती, तर त्यामध्ये शास्त्र, संवाद, कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व होते. आचार्य चाणक्य आणि पाणिनी यांसारख्या विद्वानांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे. पूर्वी भारतातील विद्यापीठांमध्ये जगभरातून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत असत.

त्यामुळे भारताचे जागतिक व्यापार, अर्थव्यवस्था आणि निर्यातीतील स्थानही महत्त्वपूर्ण होते. अनेक आक्रमणांमुळे देशातील प्राचीन शिक्षण व्यवस्था खिळखिळी झाली. मात्र, समाजसुधारकांनी शिक्षणाची परंपरा पुन्हा रुजवण्यासाठी मोठे योगदान दिले. आता या ऐतिहासिक वारशातून प्रेरणा घेऊन आधुनिक शिक्षण व्यवस्थेची उभारणी करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?

जनरेशन वॉव समोर माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे आव्हान

सध्याची पिढी माहितीच्या स्फोटाच्या काळात जन्माला आली असून तंत्रज्ञानाच्या वेगवान विस्तारासोबत तिची जडणघडण होत आहे. या पिढीला ‘जनरेशन वॉव’ (वर्ल्ड ऑफ वंडरफुल जनरेशन) असे संबोधण्यात आले आहे. या पिढीकडे माहितीचे असंख्य स्रोत उपलब्ध आहेत.

मात्र, माहितीचे ज्ञानात रूपांतर करणे, योग्य-अयोग्य ओळखणे आणि त्याचा जबाबदारीने वापर करणे हे मोठे आव्हान आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात मानवी मूल्ये, नीतिमत्ता आणि चारित्र्य जपणे आवश्यक आहे. शिक्षकांची भूमिका केवळ विद्यार्थ्यांना माहिती देण्यापुरती मर्यादित न राहता त्यांच्या विचारप्रक्रियेला योग्य दिशा देणारी असली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ऊसदराचा तिढा सुटेना! स्वाभिमानी शेतकरी संघटना मागण्यांवर ठाम, ‘दर जाहीर करा नाहीतर..,’ Raju Shetty यांचा इशारा

मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य; मान्यवरांचा पुरस्काराने गौरव

विकसित देशांची शिक्षण व्यवस्था त्यांच्या मातृभाषेवर आधारित आहे. त्यामुळे भारतानेही मातृभाषेची कास सोडू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले. तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्याऐवजी त्याचा योग्य वापर करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे माध्यम असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा आणि मुख्यमंत्री विज्ञान विद्यार्थी वारी यांसारख्या उपक्रमांचा उल्लेखही त्यांनी केला.

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पाथेय – द गोल्डन एलिक्सिर’ या ई-स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षण आणि संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. नितीश भारद्वाज यांना सर्वोत्तम नचिकेत पुरस्कार, रजिया हुसेन आणि श्रद्धा केळापुरे यांना जीवनगौरव नचिकेत पुरस्कार, तर डॉ. इंदिरा नयना आणि कंचन उके यांना सुपर नचिकेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Preserving the legacy of ancient indian education is the need of the hour chief minister devendra fadnavis assertscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

World News : इस्रायलचा वेस्ट बँकवर कडकडीत लॉकडाऊन ;हजारो पॅलेस्टिनींचे जनजीवन विस्कळीत
1

World News : इस्रायलचा वेस्ट बँकवर कडकडीत लॉकडाऊन ;हजारो पॅलेस्टिनींचे जनजीवन विस्कळीत

World News :इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला
2

World News :इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल
3

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल

Ashwini Mahangade Wedding : ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?
4

Ashwini Mahangade Wedding : ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.