उदगीर : केवळ कळवळ्याचे साहित्य लिहून उपयोग नाही; तर साहित्यिकांनी नांगराचा फाळ हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनावर दबावगट निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत मसापचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी व्यक्त केले(Pressure groups need to be formed to address farmers’ issues).
उदगीर येथे आयोजित 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण, किती खरे किती खोटे’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते. परिसंवादात डॉ. गिरीश जाखोटिया, दिलीप बिरुटे, अण्णा वैद्य, जयद्रथ जाधव, म. ई. तंगावार यांचा सहभाग होता.
केवळ साहित्यात शेतकऱ्याचे वर्णन करून होणार नाही तर त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्यावर भर दिला पाहिजे, असे मत अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणार्यांच्या विरोधात मराठी साहित्यात लेखन झाले नसल्याची खंत परिसंवादात व्यक्त करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा लोकांसमोर मांडली; मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला गेला नाही.
1960 पर्यंत मराठी ग्रामीण साहित्य हे काल्पनिक आणि मनोरंजनात्मक होते. 1960 च्या दशकापासून शेतकऱ्यांची मुले शिकायला लागल्यानंतर ग्रामीण साहित्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा प्रयत्न झाला. शंकर पाटील, आनंद यादव, रा. रं. बोराडे, व्यंकटेश माडगूळकर आदी साहित्यिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला गेला; मात्र आजही अनेक विषयांवर साहित्याच्या माध्यमातून आवाज उठवण्याची गरज आहे. जागतिकीकरणाच्या बाजारात आजही शेतकरी टिकू शकलेला नाही.
सध्या शेतकऱ्यांची मुले शिकली असली तरी त्यांना नोकरी नाही त्यामुळे इतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनावर दबाव गट निर्माण करण्याची गरज असल्याचा सूर परिसंवादात उमटला. हा परिसंवाद छत्रपती शाहू महाराज सभागृहात डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ येथे आयोजित करण्यात आला होता.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]