.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील जसापूर गावात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांने तब्बल दीडशे संत्रा झाडे तोडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या हवामान बदलामुळे संत्रा पिकाला मृगबहारच येत नसल्याने युवा शेतकरी किशोर श्रावनजी बन्नगरे यांनी आपल्या शेतातील तब्बल १५० संत्रा झाडे स्वतः मशीनच्या सहाय्याने तोडून फेकली. कृषी पदविकाधारक असलेल्या किशोर यांच्याकडे साडेपाच एकर शेती आहे. पारंपरिक शेती न करता ते फळबाग, भाजीपाला आणि फुलशेतीवर भर देतात, त्यांनी ८ वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हवामानातील सातत्याने होणारे बदल, अनियमित पावसाळा आणि बदलत्या ऋतूमानामुळे मृगबहार येत नसल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला.