Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवावे; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत 'द इंडियन एक्सप्रेस' दैनिकाने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 27, 2026 | 05:02 PM
निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवावे; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवावे; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजाबाबत ‘द इंडियन एक्सप्रेस’ दैनिकाने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. निवडणूक आयोग ही संविधानाच्या कलम ३२४ अन्वये स्थापन झालेली घटनात्मक संस्था असून १९९५ मधील ‘टी.एन. शेषन विरुद्ध भारत सरकार’ या ऐतिहासिक खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये निवडणूक आयुक्तांचे अधिकार आणि भूमिका स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये  म्हटले आहे.

 

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी आरोप केला की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करताच आयोगाच्या वतीने निर्णय घेत होते. या संदर्भातील बाबींची सविस्तर नोंद संबंधित वृत्तात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या वृत्ताचे अद्याप कोणाकडूनही खंडन करण्यात आले नसल्याचा दावाही त्यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्तांकडून अधिकाराचा उघड गैरवापर झाल्याचा आरोप करत चव्हाण यांनी, “ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते?” असा सवाल उपस्थित केला. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारवर झालेला हा सर्वात गंभीर आरोप असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेले “आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले” हे स्पष्टीकरण तपासाअंती टिकत नसल्याचा दावा करत, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर दोन सदस्यांपैकी कोणी तरी सत्य सांगत नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. मतभेद असू शकतात; मात्र कायद्यानुसार निर्णय एकमताने किंवा बहुमताने सामूहिकरीत्या घेतले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी काँग्रेस पक्षाने ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलवावी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची मागणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर

तसेच आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करावी. राज्यघटनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षाने महाभियोगाचा प्रस्ताव मांडावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. “हा विषय अत्यंत गंभीर आहे. निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काही अर्थच नाही,” असे नमूद करत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Prithviraj chavan has demanded an inquiry into the functioning of the election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Congress
  • Election Commision
  • Prithviraj Chavan

संबंधित बातम्या

Kolhapur Politics: चंद्रकांत पाटलांना काँग्रेसचं खुलं आव्हान! पुणे सोडा, कोल्हापुरातून निवडणूक लढवा
1

Kolhapur Politics: चंद्रकांत पाटलांना काँग्रेसचं खुलं आव्हान! पुणे सोडा, कोल्हापुरातून निवडणूक लढवा

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं
2

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

Harshvardhan Sapkal : नेहरू जयंतीच्या कार्यक्रमातून हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर निशाणा, ‘आताच्या पंतप्रधानांची ओळख काय?’
3

Harshvardhan Sapkal : नेहरू जयंतीच्या कार्यक्रमातून हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर निशाणा, ‘आताच्या पंतप्रधानांची ओळख काय?’

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी
4

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.