Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prithviraj Chavan News: ‘मराठी पंतप्रधानाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा सूचक विधान’; सध्याचे पंतप्रधान…

अमेरिकेत सध्या एपस्टीन फाईलबाबत मोठा गदारोळ सुरू आहे, अनेक कागदपत्रांमधील अनेक नावे नष्ट करण्यासाठी त्यावर काळ्या रंगाने ती मिटवण्यात आल्याने पूर्ण सत्य जगासमोर आले नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 24, 2025 | 03:22 PM
Prithviraj Chavan News:  ‘मराठी पंतप्रधानाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा सूचक विधान’; सध्याचे पंतप्रधान…
Follow Us
Close
Follow Us:
  • देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता
  • मराठी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, ही शक्यता मी आधीही व्यक्त केली होती
  • काही मेल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा उल्लेख
Prithviraj Chavan News: राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असल्याचे भाकित केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा एपस्टिन फाईलच्या वादावर भाष्य केल आहे. याच पार्श्वभूमीवर बोलतान त्यांनी मराठी व्यक्तीच्या पंतप्रधान पदाबाबतही खळबळजनक दावा केला आहे. मराठी पंतप्रधान होतील, पण ते बारामती किंवा कराडमधून नसतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

१९ डिसेंबरला देशात राजकीय उलथापालथ होईल होईल, असा दावा आपण कधीच केला नाही. ती फक्त शक्यता व्यक्त केली होती. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच, एपस्टिन प्रकरणाशी संबंदित अनेक नवीन कागदपत्रेही समोर येऊ शकतात. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणासोबतच भारतीय राजकारणावरही होऊ शकतो. असही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

Mumbai High Court: “जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर…”, मुंबईतील वायू प्रदूषणावर उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

मराठी व्यक्तीच्या पंतप्रधान पदाच्या चर्चेबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, “मराठी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, ही शक्यता मी आधीही व्यक्त केली होती. पण ती व्यक्ती बारामत किंवा कराडमधली नसेल, ती मराठी व्यक्त कोण असू शकते, हे राजकारणातील जाणकारांना चांगलंच माहिती आहे. पण देशाचे विद्यमान पंतप्रधान मात्र ‘ऑन बोर्ड’ आहेत. अनेक कागदपत्रातून पुढे येत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

चव्हाण यांनी यावेळी पुन्हा एकदा एपस्टिन प्रकरणाचा उल्लेख केला. जेफ्री एपस्टिन नावाच्या व्यक्तीने अनेक आंतराराष्ट्रीय आणि राजकीय नेत्यांची गुप्तपणे चित्रफित तयार केली होती, या प्रकरणात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोपही कऱण्यात आले होते. या प्रकरणातील दोषी असलेल्या सर्वांची नावं जगासमोर यायली हवीत, अशी मागणी अमेरिकेतही होत आहे.

या प्रकरणाशी संबंधित काही मेल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा उल्लेख असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. तर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीदेखील एपस्टीनची भेट घेतली होती का, याचं उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

अमेरिकेत सध्या एपस्टीन फाईलबाबत मोठा गदारोळ सुरू आहे, अनेक कागदपत्रांमधील अनेक नावे नष्ट करण्यासाठी त्यावर काळ्या रंगाने ती मिटवण्यात आल्याने पूर्ण सत्य जगासमोर आले नाही. या फाईलमध्ये काही भारतीयांची नावे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Politics: “माझे 1000 रुपये अजून…”; ठाकरेंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची जहरी टीका

हरदीप पुरी हे न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत होते. त्यांच्या आणि एपस्टीन यांच्या अनेक वेळा भेटीगाठी झाल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये आढळतो, असे चव्हाण यांनी सांगितले. मात्र, आपण अद्याप सर्व कागदपत्रे तपासलेली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. कारण हा सुमारे ३०० GB चा प्रचंड डेटा असून त्यामध्ये लक्षावधी फोटो, लक्षावधी कागदपत्रे आणि ई-मेल्सचा समावेश आहे.

या डेटामधून सर्व माहिती समोर येऊ शकते, पण ते काम अजिबात सोपे नाही, असे चव्हाण म्हणाले. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत जगभरातील माध्यमांना याच डेटाचा सखोल अभ्यास करावा लागणार असून, हेच काम सर्व मीडियासमोर असणार असल्याची पुष्टीही त्यांनी दिली.

 

 

Web Title: Prithviraj chavan news prithviraj chavans re introductory legislation regarding marathi prime minister present prime minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Congress
  • Prithviraj Chavan

संबंधित बातम्या

Congress on Thackeray Alliance: राज-उद्धव युतीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रीया; आम्ही कधीही मनसेशी…
1

Congress on Thackeray Alliance: राज-उद्धव युतीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रीया; आम्ही कधीही मनसेशी…

Maharashtra Politics : भाजपा पुन्हा देणार धक्का! काँग्रेससह मनसेचे दिग्गज नेते भाजपाच्या वाटेवर
2

Maharashtra Politics : भाजपा पुन्हा देणार धक्का! काँग्रेससह मनसेचे दिग्गज नेते भाजपाच्या वाटेवर

लोकसभेप्रमाणे महागरपालिकेतही काँग्रेसला विजयी करा, धुळे महानगरपालिकेवर एकहाती सत्ता द्या; सपकाळांचे आवाहन
3

लोकसभेप्रमाणे महागरपालिकेतही काँग्रेसला विजयी करा, धुळे महानगरपालिकेवर एकहाती सत्ता द्या; सपकाळांचे आवाहन

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
4

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.