Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओम बिरलानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त विरोधकांच्या निशाण्यावर; ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

काँग्रेस आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्धही असाच एक प्रस्ताव आणण्याची योजना आखत आहे. याबाबत इंडिया आघाडीमध्ये देखील चर्चा झाली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 10, 2026 | 12:12 PM
Central Election Commission Chief Election Commissioner Dnyanesh Kumar no-confidence motion from Congress

Central Election Commission Chief Election Commissioner Dnyanesh Kumar no-confidence motion from Congress

Follow Us
Follow Us:
  • ओम बिरलानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आक्रमक
  • ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव
  • काँग्रेसच्या बड्या नेत्याची कबुली
No-confidence motion against Chief EC : नवी दिल्ली : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यावर अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. ओम बिरला (Om Birla) हे विरोधकांना बोलण्याची संधी नाकारत असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) मुख्य निवडणूक आयुक्त देखील विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांकडून केली जात आहे.

काँग्रेस आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्धही असाच एक प्रस्ताव आणण्याची योजना आखत आहे. सोमवारी विरोधी पक्षांच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ओम बिरला यांच्या अविश्वास प्रस्तावाचा निकाल लागल्यानंतर, विरोधी पक्ष ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे. जर विरोधी पक्ष संसदेत महाभियोगाची सूचना देत असेल, तर देशातील पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जाईल.

हे देखील वाचा : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

देशातील अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपचा दणाणून विजय झाला असून काँग्रेसला मोठा फटका बसला. यावेळी ईव्हीएमचा चुकीचा वापर झाला असून मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. याबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदा देखील घेतल्या आहेत. यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरु केला आहे.

हिंदूस्तानच्या रिपोर्टनुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, एसआयआरच्या निषेधार्थ ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध हा प्रस्ताव मांडला जाईल. “इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी देखील याविषयी चर्चा झाली आहे आणि विविध राज्यांमध्ये मतदार यादीच्या सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणांबाबत कुमार यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्यास सर्व पक्ष तयार आहेत,” असे ते म्हणाले. “हे आलटून पालटून होईल. बिर्ला यांच्याविरुद्धच्या सूचनेवर मंगळवारी विचार केला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे काँग्रेस नेते म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : राष्ट्रपती उभ्या आणि पंतप्रधान बसलेले? व्हायरल फोटोवर भाजपने मांडली खरी बाजू; पाहा काय आहे सत्य

 

Web Title: Central election commission chief election commissioner dnyanesh kumar no confidence motion from congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Congress
  • Election Commission
  • Om Birla

संबंधित बातम्या

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?
1

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ
3

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
4

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.